27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeKhedकशेडी बोगद्यातील गळती थोपवण्यासाठी नव्या तंत्राचा वापर

कशेडी बोगद्यातील गळती थोपवण्यासाठी नव्या तंत्राचा वापर

गळती थोपवण्यासाठी 'ग्राऊटींगचा वापर केला होता. 

मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडी बोगदा ठिकठिकाणी लागलेल्या गळतीमुळे चर्चेत आला होता. बोगद्यातील मोठी गळती ‘ग्राऊटींग’च्या सहाय्याने थोपवण्यात आल्याने गणेशभक्तांवरील धोक्याची टांगती तलवार दूर होवून प्रवास सुखकर होत आहे. वाहनांची रहदारी कमी होताच लहान गळती रोखण्यासाठी नव्या तंत्राचा अवलंब करण्यात येणारं असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली. जुलै महिन्यात सतत आठवडाभर झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे कशेडी बोगद्यात ठिकठिकाणी गळतीचे सत्र सुरू झाले होते. राष्ट्रीय महामार्ग खात्याने गळती थोपवण्यासाठी ‘ग्राऊटींगचा वापर केला होता.

मात्र तरीही गळती थोपवण्यात अपयश आल्याने राष्ट्रीय महामार्ग खात्याची डोकेदुखी वाढली होती. वाहनचालकांनाही जीव मुठीत धरून बोगद्यातून मार्गस्थ व्हावे लागत होते. ऑगस्ट अखेरीस राष्ट्रीय महामार्ग खात्याने कामगारांची जादा फौज तैनात करत गळती नियंत्रणात आणण्यात यश मिळवले. सद्यस्थितीत केवळ लहान गळती सुरू असून वाहनांची रहदारी कमी झाल्यानंतर लहान गळती थोपवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या गळती रोखण्यासाठी ग्राऊटींगसह वेगळ्या तंत्राचा अवलंब करावा लागणार आहे.

लहान गळती पूर्णपणे थोपवून बोगद्यातील वाहतूक सुरक्षित केली जाईल, असेही सांगण्यात आले. गणेशोत्सवात कशेडी घाटातील दोन्ही बोगदे वाहतुकीसाठी खुली असल्याने चाकरमान्यांचा प्रवास सुस्साट अन् आरामदायी झाला आहे. ४५ मिनिटांचे अंतर अवघ्या ८ मिनिटातच पार करणे शक्य झाल्याने चाकरमानी बोगद्यातूनच प्रवास करण्यास पसंती देत आहेत. यामुळे दोन्ही बोगद्यातून मार्गस्थ होणाऱ्या वाहनांच्या संख्येत कम ालीची वाढ झाली आहे. वाहतूक नियंत्रणासाठी कशेडी बोगद्याच्या दोन्ही बाजूला कशेडी येथील वाहतूक पोलिसांची फौज दिवस-रात्र तैनात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular