29.4 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriएसटीने मोडले खासगी वाहतूकदारांचे कंबरडे

एसटीने मोडले खासगी वाहतूकदारांचे कंबरडे

बहुतांशी एसटीच्या प्रवाशांनी आगाऊ बुकिंग केले होते.

गौरी-गणपती सणासाठी मुंबई-पुणे तसेच अन्य शहरांतून आलेल्या गणेशभक्तांच्या प्रवासासाठी तब्बल ३३७ जादा गाड्या आरक्षित झाल्या. त्यामुळे यावेळी एसटीने खासगी वाहतुकीचे कंबरडे मोडल्याचे चित्र चिपळूणमध्ये आहे. अनेकांकडे खासगी वाहने असताना गणेशभक्तांनी एसटीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. चिपळूण आगारातर्फे ११ सप्टेंबरपासून जादा बस सोडण्यास सुरुवात झाली आहे. ११ सप्टेंबरला २७ बसेस, १२ ला १३० बस आणि १३ ला १३० बस सोडण्यात आल्या. या बसचा १६ हजारांहून अधिक प्रवाशांना लाभ होणार असून, त्यांची गैरसोय टाळणार असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

तुटलेले दरवाजे, फुटलेल्या काचा आणि गळके छत, अशी एसटीची अवस्था असल्यामुळे मागील काही वर्षांपासून गणेशभक्त खासगी वाहतुकीला प्राधान्य देत होते. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूकदारांची चलती होती. गणेशोत्सव तोंडावर असताना एसटी कर्मचारी संघटनेने संप पुकारल्यानंतर खासगी वाहतूकदारांना आनंद झाला होता. एसटीचे प्रवासी त्यांच्याकडे वळतील, असे त्यांना वाटले होते; परंतु बहुतांशी एसटीच्या प्रवाशांनी आगाऊ बुकिंग केले होते. एसटी प्रशासनाला कर्मचाऱ्यांचा संप मिटविण्यात यश आले. त्यामुळे गणेशभक्त सुखरूपपणे चिपळूणमध्ये दाखल झाले.

गणेशोत्सव आनंदात साजरा करून ते पुन्हा शहराकडे वळले आहेत. खासगी वाहतुकीच्या बसला एसटीपेक्षा जास्त तिकीट असल्यामुळे यावर्षी गणेशभक्तांनी एसटीला प्राधान्य दिले आहे. परतीच्या प्रवासाच्यावेळी कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी आगारातर्फे खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती दीपक चव्हाण यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular