27.6 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriशिवसेनेतील निष्ठावंतालाच उमेदवारी - विनायक राऊत

शिवसेनेतील निष्ठावंतालाच उमेदवारी – विनायक राऊत

विधानसभा मतदार संघातील विभागप्रमुखांची बैठक घेतली.

रत्नागिरी विधानसभा मतदार संघात उदय सामंत यांच्या विरोधात लढण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे सक्षम उमेदवार आहेत. पक्षाकडून निष्ठावंतालाच उमेदवारी दिली जाईल. इतर पक्षातील कोणाचेही नाव चर्चेत नाही. आजच्या बैठकीत विभागप्रमुखांनी निष्ठावंतांनाच संधी देण्याची मागणी केली आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या विनायक राऊत यांनी त्यांच्या कार्यालयात रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील विभागप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

या वेळी सहसंपर्कप्रमुख राजू महाडीक, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांसोबत राऊत यांनी चर्चा केली. त्यानंतर विभागप्रमुख हेमंत पवार, मयुरेश पाटील, राकेश साळवी, महेंद्र झापडेकर, उत्तम मोरे, किरण तोडणकर, भाऊ देसाई यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. या सर्वांशीच वैयक्तीक चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर सर्वच पदाधिकाऱ्यांशी एकत्रित चर्चा केली. उमेदवारीबाबत अंतिम निर्णय पक्षाध्यक्षच घेतील, असेही विनायक राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पक्ष जो कोणी उमेदवार देईल त्याचे प्रामाणिक काम करू; मात्र पक्षातीलच उमेदवार असावा, अशा भावना सर्वांनी व्यक्त केल्या.

RELATED ARTICLES

Most Popular