27.5 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

जिल्ह्यात रंगणार गुरू विरुद्ध शिष्य लढत तटकरे-सामंत आमनेसामने

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या...

रघुवीर घाटात पुन्हा कोसळली दरड…

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, आज दिवसभर...

कोत्रेवाडी कचरा प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा…

कोत्रेवाडी येथील नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरणारा डंपिंग...
HomeDapoliसाथ देणाऱ्या युवा पिढीच्या कल्याणाची जबाबदारी माझी - आ. योगेश कदम

साथ देणाऱ्या युवा पिढीच्या कल्याणाची जबाबदारी माझी – आ. योगेश कदम

दापोली मतदार संघातील तरुणांना रोजगार निर्माण करून देणार आहे.

युवा पिढीचा उपयोग मी फक्त राजकारणापुरता करून घेणार नाही. “कारण मीही एक युवा आमदार आहे. मेला युवकांच्या भावना त्यांच्या समस्था कळतात. आजपर्यंत युवा पिढीचा उपयोग फक्त स्वार्थी राजकारणापुरता केला गेला आहे. मात्र मी तसे होऊ देणार नाही. मला माझ्या राजकीय वाटचालीत समर्थपणे साथ देणाऱ्या युनेकांच्या भविष्याच्या कल्याणाची जबाबदारी ही माझी असेल असे उद्‌गार दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी काढले. ते दापोली देवील शिंदे सभागृह येथे पार पडलेल्या युवासेनेच्या निर्धार मेळाव्या प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, दापोली मतदार संघातील तरुणांना रोजगार निर्माण करून देणार आहे.

रस्ते, पाखाडी, “सभागृह या मूलभूत गरजा झाल्या, त्या तर होतीलच, मात्र मुख्य प्रश्न आहे तो रोजगाराचा आज ५० टक्के गाव रिकामी झाले आहेत. त्याचे एकमेव कारण कोकणात रोजगाराची संधी उपलब्ध नाही. यापुढे कोकणातील एकही युवक मुंबई पुणे शहरांकडे वळणार नाही. कारण मला माझ्या युवा पिढीचे भवितव्य या कोकणाच्या धरतीवर उभ करायचा आहे आणि मी ते येत्या पाच वर्षात नक्कीच करून दाखवणार, असा ठाम विश्वास आम. योगेश कदम यांनी यावेळी व्यक्त केला.

या निर्धार मेळाव्याला उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, मुंबई संपर्कप्रमुख सुधीर कदम, उपजिल्हा महिला संघटक रोहिणी दळवी, माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे, तालुका संघटक श्री. प्रदीप सुर्वे, तालुकाप्रमुख उन्मेष राजे, युवती प्रमुख ऐश्वर्या कामतेकर, युवती शहर प्रमुख कीर्ती परांजपे, संपर्कप्रमुख प्रदीप जाधव, उपजिल्हाध्यक्ष अमित पारदुले, तालुका अध्यक्ष सुमित जाधव, युवा तालुका सचिव राजेश झगडे, युवा सेना शहराधिकारी बाबू पारकर, किरण बांद्रे, राजकारणी सदस्य चेतन सातोंपे, नगरसेविका शिवानी खानविलकर, श्री. प्रकाश साळवी, नगरसेविका कृपा घाग, प्रीती शिके आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular