25.8 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeEntertainmentप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचे अकाली निधन

प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचे अकाली निधन

आपल्या चतुरस्त्र अभिनयाने त्यांनी अनेक नाटकं आणि सिनेमे गाजविले होते.

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरचे सुपुत्र आणि मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीतील चतूरस्त्र अभिनेते अतुल परचुरे यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ५७ वर्ष होते. अतुल परचुरे यांच्या आकालीन निधनाने मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. काही वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. मात्र या आजाराशी यशस्वी संघर्ष करत ते बरे झाले होते. मात्र सोमवारी सायंकाळी त्यांच्या निधनाचे वृत्त हाती येताच अवघा महाराष्ट्र हळहळला. आपल्या चतुरस्त्र अभिनयाने त्यांनी अनेक नाटकं आणि सिनेमे गाजविले होते. विनोदी अभिनेते म्हणून ते सुपरिचीत झाले तरी अन्य भूमिकाही त्यांनी तितक्याच ताकतीने सादर केल्या होत्या.

प्रसिद्ध व्यक्ती आणि वल्ली या नाटकात पु. ल. देशपांडे यांची भूमिका अतुल परचुरे यांनी साकारली आणि पु.ल. देशपांडे यांनी ती पाहिली आणि त्यांना शाबासकी दिली होती. अतुल परचुरेंना कर्करोग झाला होता, त्यातूनही ते बाहेर पडले. त्याच्या जिद्दीचं कौतुक झालं होतं. नाटक, सिनेमा, चित्रपट या सगळ्या माध्यमांम ध्ये त्यांनी काम केलं. सुर्याची पिल्ले हे पुन्हा रंगभूमिवर येत होते आणि अतुल परचुरे यांनी त्यात भुमिका करून आपले कमबॅक केले होते. कोकणच्या या सुपुत्राने नाटक, सिनेमा, मालिका सगळ्याच माध्यम ांवर अधिराज्य केलं.

अतुल परचुरेंनी त्याच्या अष्टपैलू अभिनयाच्या जोरावर रंगभूमी, छोटा पडदा, मालिका विश्व सगळंच गाजवलं. ‘कापूस कोंड्याची गोष्ट, नातीगोती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, व्यक्ती आणि वल्ली, या नाटकांम धल्या त्यांच्या भूमिका चर्चेत राहिल्या. द कपिल शर्मा शो या कार्यक्रमातही अतुल परचुरे यांनी बराच काळ काम केलं. अलिबाबा आणि चाळिशीतले चोर हा अतुल परचुरेंचा शेवटचा सिनेमा ठरला.

कलाविश्व हळहळलं – अतुल परचुरे यांनी जिगरबाज वृत्तीनं कॅन्सरवर मात केली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा काम करण्यास सुरुवात केली होती. मराठी रंगभूमीवर पुन्हा दाखल झालेल्या सूर्याची पिल्ले या नाटकातही त्यांची भूमिका. होती. पण, कॅन्सरनंतरची त्यांची इनिंग दुर्दैवानं फार काळ चालली नाही. त्यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. अष्टपैलू अभिनेता, चांगला मित्र गमावल्याची भावना त्यांच्या सहकलाकारांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गजांनी अतुल परचुरे यांच्या निधनाने दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या मागे त्याची आई, पत्नी आणि मुलगी असं कुटुंब आहे.

RELATED ARTICLES

Most Popular