26.8 C
Ratnagiri
Wednesday, November 6, 2024

Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक बाईक समोर आली आहे

रॉयल एनफिल्डने इटलीतील मिलान येथे सुरू असलेल्या...

‘रामायण’मध्ये रणबीर कपूर करणार डबल धमाका…

रणबीर कपूर आणि सई पल्लवी स्टारर 'रामायण'...

नीलेश राणेंकडून जैतापकरांची समजूत, थेट हेलिकॉप्टरने धाडले गुहागरात

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना...
HomeRatnagiriमला कोणी टार्गेट करत असेल तर त्याला जनताच उत्तर देईलः सामत

मला कोणी टार्गेट करत असेल तर त्याला जनताच उत्तर देईलः सामत

प्रकल्पासंदर्भात शेतकऱ्यांचे गैरसमज दूर करूनच प्रकल्पबाबत निर्णय होईल.

जनतेचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. त्यामुळे कोणाचेही मनसुबे सफल होणार नाहीत. जर मला जाणूनबुजून कोणी टार्गेट करत असेल त्याला रत्नागिरीची जनताच उत्तर देईल. काल परवा झालेली ती सभा माझ्यासाठी नव्हती तर. अदृश्य व्यक्तीच्या विरोधात होती. असे सांगून ना. उदय सामंत यांनी कोणाचेही नाव न घेता बाळ माने यांनी घेतलेल्या सभेवर नाव न घेता टीका केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना ना. उदय सामंत म्हणाले की, मी दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून लढलो. २०१४ ला तर सर्व पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले, मला मदत करणारे आजही उबाठात आहेत.

युती कोणी तोडली तर ती एकनाथ खडसे यांनी तोडली. मी सोईनुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा वापर करतो म्हणाऱ्यांना उत्तर देताना ना. सामंत म्हणाले की, माझे आणि फडणवीस यांचे समंध आजचे नाहीत. जर मी असे वागत असेल तर त्यांनी फडणवीस यांना सांगाव असे ना. सामंत म्हणाले. ज्यांना मला पाडायचं आहे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. माझं पोट राजकारणावर नाही. असे सांगून ते न ते पुढे म्हणाले की, बाळ माने यांना न्याय मिळावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहे.

माझे भाजपा सोबत चांगले संबंध आहेत. मी कोणालाही दुखावलेले नाही. उमेदवारी बाबत बोलताना ते पुढे म्हणाले की, जर तिकीट भाजपला मिळाले तर मी भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करेन. मात्र कालची मिटिंग माझ्यास की नव्हती तर अदृश्य माणसासाठी होती. यावेळी बोलताना ना. सामंत पुढे म्हणाले की, टाटा स्किल सेंटर सोबत झालेल्या एमओयू तून ३० हजार मुला-मुलींना रोजगार मिळणार आहेत. १ हजार ५०० मुलांना परदेशात नेऊन प्रशिक्षणाची संधी आणि कायमस्वरूपी नोकरी देण्यासंदर्भात कालच सरकारसोबत एमओयू झालेला आहे. वाटद डिफेन्स क्लस्टर प्रकल्पासंदर्भात शेतकऱ्यांचे गैरसमज दूर करूनच प्रकल्पबाबत निर्णय होईल.

RELATED ARTICLES

Most Popular