22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiri'दिव्यांगां'ना पेन्शनची प्रतीक्षाच कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडेही शासनाचा कानाडोळा

‘दिव्यांगां’ना पेन्शनची प्रतीक्षाच कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडेही शासनाचा कानाडोळा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसात सरकारने शेकडो निर्णय घेतले.

दिव्यांग कर्मचाऱ्यांची सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांची पेन्शन अद्यापही जमा झालेली नाही. त्यामुळे दिव्यांगांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गणपतीप्रमाणेच दिवाळीमध्येही त्यांना पेन्शनची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जिल्ह्यात जोरात आहे. निवडणुकीपूर्वी ही योजना तळागाळात पोचविण्यासाठी आचारसंहितेपूर्वी सरकारने आणि शासनाने कडक भूमिका घेतली होती. तसे असले तरीही दिव्यांगांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले. गणपती गेले, दिवाळी आली तरीही पेन्शनची दिव्यांगांना प्रतीक्षाच आहे. मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाचीही दखल शासनाने न घेतल्यामुळे नाराजीत भर पडली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसात सरकारने शेकडो निर्णय घेतले. मात्र सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्याची पेन्शन जमा करण्याविषयी कानाडोळा केला गेला. केंद्राप्रमाणे वाहतूक भत्ता, सहायक उपकरणांसाठी मागील सहा वर्षांपासून थकित असलेले अनुदान व अनुशेष, पदोन्नती या मागण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलनही केले. त्याची दखल न घेतल्यामुळे दिव्यांग कर्मचारी संतापलेले आहेत, असे दिव्यांग समन्वय समिती जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular