28.2 C
Ratnagiri
Sunday, July 20, 2025

हरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा...

आरजू फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे...

पावसाने जनजीवन विस्कळीत, झाड पडून तिघे जखमी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार...
HomeMaharashtraभाजपची यादी आज येणार? निलेश राणेंच्या उमेदवारीकडे लक्ष

भाजपची यादी आज येणार? निलेश राणेंच्या उमेदवारीकडे लक्ष

११० जणांची यादी जाहीर होणार आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या २० नोव्हेंबरला राज्यात मतदानाचा बार उडणार आहे. त्यात आता भाजपाची पहिली ११० उमेदवारांची यादी शुक्रवारी सायंकाळी येण्याची शक्यता आहे. त्या यादीत आमदार नितेश राणे यांचे नाव असण्याची शक्यता आहे. पण त्यांचे बंधू निलेश राणे यांचे नाव कुडाळ मालवण मतदार संघातून असणार का ? याविषयी उत्सुकता असून त्यामुळे भाजपच्या यादीकडे सर्वांचे दिल्लीकडे डोळे लागले आहेत. राज्यात विधानसभा निवडणूकांचे बिगुल वाजले असून महिनाभराने येत्या २० नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार आहे. यानंतर २३ नोव्हेंबरला मजमोजणी होणार आहे.

राज्यातील विधानसभेची मुदत येत्या २६ नोव्हेंबर रोजी संपत असल्याने त्या आधी नवी विधानसभा गठित होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमिवर सर्वच पक्षांचे नेते सध्या उमेदवार ठरवण्याच्या कामाला लागले आहेत. महाराष्ट्र विधानसभेसाठीची भाजपाची पहिली ११० उमेदवारांची यादी शुक्रवारी येण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत काही प्रमुख चेहरे पाहायला मिळणार आहेत. उर्वरित जागांवरचा तिढा अजून सुटलेला नाही. तसेच कुडाळमध्ये काय होणार ? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

निलेश राणेंना उमेदवारी मिळणार? – कुडाळ येथून माजी खासदार निलेश राणे यांना उमेदवारी मिळावी या साठी खासदार नारायण राणे यांनी अमित शाह यांच्याकडे आपली ताकद लावल्याची चर्चा आहे. निलेश राणे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून उमेदवारी देतात का बघा ? अशा सूचना अमित शाह यांनी खासदार राणे यांना केल्याचे कळते. पण याबाबतच्या वृत्ताला कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मात्र राणे यांन गेल्या काही दिवसात मुख्यमंत्र्यांची दोन वेळा भेट घेतल्याने निलेश राणे याना शिंदे गटातून उमेदवारी मिळणार या चर्चेने जोर धरला आहे.

आज यादी जाहीर होणार – शुक्रवारी ११० जणांची यादी जाहीर होणार आहे. त्या साठी दिल्लीत बैठक होत आहे. यात नितेश राणे यांना कणकवलीतून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. पण निलेश राणे यांना उमेदवारी मिळते का ? या कडे लक्ष लागले आहेत. आपल्याला भाजपने उमेदवारी द्यावी अशी मागणी निलेश राणे यांनी यापूर्वी केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत खासदार राणे यांना कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात २७ हजारांच मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे निलेश राणे यांचे मनोबल वाढले आहे. त्यामुळे त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular