25.1 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeKhedगुहागरमधून राजेश बेंडल यांना उमेदवारी माजी आ. विनय नातूंचा ग्रीन सिग्नल?

गुहागरमधून राजेश बेंडल यांना उमेदवारी माजी आ. विनय नातूंचा ग्रीन सिग्नल?

महायुतीचा गुहागर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार कोण हा सस्पेन्स अजूनही कायम आहे. जागा वाटपात गुहागर मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेच्या पदरात पडला आहे. मात्र आपला हा पारंपारिक मतदारसंघ असल्यामुळे आपल्याला तो मिळावा यासाठी भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आग्रही आहेत. असे असले तरी हा मतदारसंघ शिवसेनाच लढवेल आणि माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल हे उमेदवार असतील असे राजकीय गोटातील वृत्त आहे. बेंडल यांच्या उमेदवारीला डॉ. नातू यांनी ग्रीन सिग्नल दिल्याची चर्चा सुरु आहे. अधिकृतपणे मात्र याविषयी दोन्ही बाजूंकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या मतदारसंघातून भाजपाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी गेले वर्षभर तयारी सुरू केली होती. अशातच गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या उमेदवारीची मागणी पालकमंत्री ना. उदय सामंत आणि पदाधिकाऱ्यांनी केली होती.

मात्र नातू यांचा ग्रीन सिग्नल मिळाल्याशिवाय ही उमेदवारी जाहीर करणे शिवसेनेलाही परवडणार नाही याची जाणीव असल्याने या जागेचा सस्पेन्स कायम ठेवण्यात आला होता. गुहागर शहरविकास आघाडीचा केलेला प्रयोग पुन्हा केला जाणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी नगरपंचायत निवडणुकीत वापरलेला फॉर्म्युलाच या विधानसभा निवडणुकीत वापरणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. भाजपचे माजी आमदार आणि सध्या या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेले डॉ. विनय नातू यांच्याशी थेट मुख्यमंत्र्यांच्यावतीने संपर्क साधण्यात आल्याचे वृत्तं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जाणारे ठाणे येथील माजी आमदार रवींद्र फाटक आणि डॉ. विनय नातू यांच्यात झालेल्या बैठकीनंतर राजेश बेंडल यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.

खास भेटीसाठी गुहागरात – डॉ. विनय नातू यांची खास भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय ठाण्यातील रवींद्र फाटक दोन दिवसांपूर्वी गुरुवारी गुहागर दौऱ्यावर आले होते. यावेळी झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यावेळी रवींद्र फाटक यांच्याबरोबर शिवसेनेचे गुहागर तालुक्यातील काही पदाधिकारी होते. गुहागर तालुक्यातील मार्गताम्हाने येथील नातू यांच्या निवासस्थानी जाऊन फाटक यांनी भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत रवींद्र फाटक यांनी नातू यांना सहकार्य करण्याची विनंती केली असून आपण एकमेकांना सहकार्य करून ही जागा निवडून आणू अशा स्वरूपाची चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

नगरपंचायतीचा फॉर्म्युला – दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आम दार भास्कर जाधव यांच्याविरोधात सर्व पक्षांनी एकत्र येत गुहागर नगरपंचायत निवडणुकीत सहा वर्षांपूर्वी एक फॉर्म्युला वापरला होता. गुहागर शहर विकासआघाडी स्थापन करत त्यावेळी १६ जागांवर यश मिळवले होते. त्यावेळी माजी आमदार विनय नातू यांच्या सहकार्यानेच राजेश बेंडल हे नगराध्यक्ष झाले होते. आता शहरविकास आघाडीचा तोच फॉर्म्युला माजी आमदार विनय नातू हे या विधानसभा निवडणुकीत वापरण्याची शक्यता अधिक आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आम्ही गुहागरचा उमेदवार हा विमानातून घेऊन येऊ, असं सांगत या गुहागर विधानसभा मतदारसंघात सस्पेन्स अधिकच वाढवला होता. याच मतदारसंघातून संभाव्य उमेदवार म्हणून खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांचे नाव यापूर्वी समोर आलं होतं. मात्र, आता हे नाव मागे पडले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular