31 C
Ratnagiri
Friday, May 9, 2025

निधी अभावी काजू तारण योजना पडली बंद – कृषी उत्पन्न बाजार समिती

बदलत्या हवामानाच्या परिणामामुळे दरवर्षी काजूची उत्पादकता घटलेली...

पाईपलाईनचे काम अखेर सुरू, शीळ धरण ते जॅकवेल परिसर

शीळ धरण कालवा ते जॅकवेलपर्यंतची " सुमारे...

जिल्हाभरात दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ

सलग दुसऱ्या दिवशी सकाळीच पडलेल्या पावसाने जिल्हावासीयांना...
HomeKhedस्वप्नात दिसलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी 'माचिस'चा धागा पकडत पोलीसांनी गाठले तामिळनाडू

स्वप्नात दिसलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी ‘माचिस’चा धागा पकडत पोलीसांनी गाठले तामिळनाडू

स्वप्नात मृतदेह दिसल्याचे सांगणारा तरूण योगेश आर्या हा अजूनही गायबच आहे.

सावंतवाडीतील तरूणाला पडलेल्या स्वप्नामुळे खेडमधील भोस्ते घाटातील मृतदेहाचा शोध लागला. मात्र तो मृतदेह कोणाचा हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्या मृतदेहाच्या पॅन्टच्या खिशात मिळालेल्या टायगर माचिस (काडेपेटी) वरून पोलिस थेट तमिळनाडुत पोहचले. त्याची लिंक कोल्हापूर येथील माचिस वितरकापर्यंत आली आहे. त्यापुढे पोलिसांनी तापस सुरू केला. आहे. कोल्हापूरातील बेपत्तांचीही पोलिस माहिती घेत आहेत. दरम्यान स्वप्नात मृतदेह दिसल्याचे सांगणारा तरूण योगेश आर्या हा अजूनही गायबच आहे. त्याचा मानसोपचार तज्ञांच्या अहवाल प्राप्त झाला असून त्याला स्वप्न रंगविण्याचा आजार असल्यासे स्पष्ट झाले आहे. योगेश पिंपळ आर्या (वय ३०रा. सावंतवाडी आजगांव) यांने खेड भोस्ते घाटातील डोंगरात जंगलात पुरुषाचे प्रेत असून तो माझ्या स्वप्नात येऊन मला मदत करा, असे पोलीसांना सांगितले. १७ सप्टेंबरला याबाबत आर्याने खेड पोलिस ठाण्यात तशी खबर दिली असून पोलिसांनी याची नोंद एफआयआरमध्ये सुद्धा केली आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.

घटनाक्रमात तफावत – तरूणाला सावंतवाडीतील पडलेल्या स्वप्नामुळे खेड भोस्त घाटातील मृतदेहाचा शोध लागला. सर्वांनाच अचिंबत करणारा हा प्रकार आहे. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीमध्ये तरूणांने सांगितलेला घटनाक्रम आणि वस्तुस्थितीमध्ये प्रचंड तफावत असल्याने हा सर्व बनाव असल्याचा संशय आहे. मात्र तरीही पोलीस शोध घेत आहेत. मृताची ओळख पटण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू आहे. त्यामुळे संबंधित तरुणाची मानसोपचार तज्ज्ञाद्वारे तपासणी केली जाणार होती.

माचिसचा धागा – या दरम्यान पोलिसांना मृतदेहाच्या अंगावर असलेल्या कपड्यामध्ये- माचिस (काडेपेटी) सापडली. परंतु ही टायगर कंपनीची माचिस आहे. वेगळा बॅण्ड असल्याने पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटण्यासाठी माचिस बॉक्सचा धागा पकडत पोलिस थेट तामिळनाडुपर्यंत पोहचले. तेथुन ही माचिस कोल्हापूर येथील वितरकाकडुन वितरित झाल्याचे समजले. त्यामुळे पोलिस आता कोल्हापूर येथे या प्रकरणाची लिंक लागते का याचा तपास करत आहेत. मृतदेह कोणाचा हे ओळख पटल्यास या प्रकरणाचा उलगडा होण्यास मदत होणार आहे. म ात्र या प्रकरणातील आर्या अजून गायब आहे. पोलिस त्याच्या शोधात आहेत. त्याचा मानसोपचार तज्ज्ञांबाबतचा अहवाल प्राप्त झाला आहे. आर्याला स्वप्न रंगविण्याचा आजार असल्याचे त्यात म्हटले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular