29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

बसरा स्टार जहाज पाच वर्षांनंतर भंगारात, दोन कोटींत व्यवहार

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या किनाऱ्यावर...

गुरूपौर्णिमेहून परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला तिघांचा मृत्यू

गुरूवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नाशिक-मुंबई महामार्गावरील...

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...
HomeRatnagiriनिवडणुकीची 'ड्यूटी रद्दसाठी ४०० अर्ज…

निवडणुकीची ‘ड्यूटी रद्दसाठी ४०० अर्ज…

सोमवारी निवडणूक विभाग यावर निर्णय घेणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान २० नोव्हेंबरला होणार आहे. या निवडणुकीच्या कामासाठी विविध सरकारी विभागातील सुमारे साडेसात ते आठ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे प्रशिक्षणही झाले आहे. तरी जिल्ह्यात त्या-त्या विभागात कोणत्याही केंद्रावर नियुक्ती होणार असल्याने अनेकांना निवडणूक ड्यूटी नावडती झाली आहे. ही ड्यूटी रद्द व्हावी, यासाठी ४०० जणांनी वैद्यकीयसह अनेक कारणे दिली आहेत. कोणाला उच्च रक्तदाब, मधुमेह, निवृत्ती आली आहे, मुलाचे-मुलीचे लग्न आहे, काही महिलांनी गर्भवती असल्याचे कारण दिले आहे. सोमवारी निवडणूक विभाग यावर निर्णय घेणार आहे. जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया अगदी पारदर्शक व्हावी, यासाठी जिल्हा निवडणूक विभाग आणि प्रशासनाचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात सुमारे साडेतेरा लाखांच्या दरम्यान मतदार आहेत. सतराशेच्यावर मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रावर सुरळीत मतदान प्रक्रिया होण्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा निवडणूक विभागाने विविध शासकीय विभागातील सुमारे साडे ७ ते ८ हजार कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती केली आहे. त्यासाठी या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. नियुक्त करण्यात आलेल्या या कर्मचाऱ्यांची जिल्ह्यातील त्या-त्या विभागात कोणत्याही मतदान केंद्रावर नियुक्ती होणार आहे. जिल्ह्यातील सुमारे ४०० शासकीय कर्मचाऱ्यांनी निवडणुकीची ड्युटी रद्द व्हावी, यासाठी अर्ज केले आहेत. या अर्जामध्ये अनेकांनी विविध वैद्यकीय कारणे दिली आहेत. निवडणुक विभाग वैद्यकीय कारण’ आणि वस्तूस्थितीचा विचार करून यावर निर्णय घेणार आहे. खरे कारण असेल तर अर्ज मंजूर केला जाईल अन्यथा फेटाळला जाईल, असे सांगण्यात आले.

वस्तूस्थितीचा विचार करून निर्णय – निवडणुकीची ड्यूटी रद्द बाबत आलेल्या अर्जावर सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. निवडणूक विभाग अर्जदाराचे वैद्यकीय कारण आणि वस्तुस्थितीचा विचार करून यावर निर्णय घेणार आहे. खरे कारण असेल तर अर्ज मंजूर केला जाईल, अन्यथा फेटाळला जाईल असे विभागाकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular