26 C
Ratnagiri
Wednesday, September 3, 2025

गणेशोत्सवात ‘कोरे’चा प्रवाशांना दिलासा…

कोकण रेल्वे प्रशासनाने यंदा गणेशोत्सवासाठी केलेल्या विशेष...

चिपळूण पालिकेच्या इमारतीचा वापर थांबवा

पालिकेची मुख्य इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक...

मुंबईतून ‘रो-रो बोट’ साडेसात तासांत रत्नागिरीत…

मुंबई ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग रो-रो बोट सेवेची चाचणी...
HomeRatnagiriविष कालवायचे नाही म्हणून माघार - उदय बने

विष कालवायचे नाही म्हणून माघार – उदय बने

मी सर्वच उमेदवारांना सांगतो की, जनतेच्या समस्यांकडे बघा.

पक्षात कोणतेही विष कालवायचे नाही म्हणून माघार घेतली. विधानसभा निवडणुकीत माझ्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. उदय बने आणि बंड याचा दुरान्वयेही संबंध नाही. मी गावागावांत शाखा काढणारा, शिवसेना रूजवणारा सैनिक आहे. मी निवडणूक लढवण्यास इच्छुक नव्हतोच; पण नेतमंडळींनी शिफारस केली, कार्यकारिणीने ठराव केला; पण मी तेवढा सक्षम नाही. यापूर्वी माझे ब्रेन हॅमरेज झाले होते. २० दिवस कोमात होतो. आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे थांबण्याचा निर्णय घेतलाय; पण मी आणि कार्यकर्ते कोणत्याही पक्षात जाणार नाही, असे भावनिक प्रतिपादन ज्येष्ठ शिवसैनिक उदय बने यांनी केले. पत्रकारांशी बोलताना बने म्हणाले की, मी इच्छुक नसताना माझे नाव वर पाठवले; पण पक्षाने बाळ माने यांना एबी फॉर्म दिला. नाराजी म्हणून अर्ज भरला होता व तो आज मागे घेतला आहे. पक्षात कोणतेही विष कालवायचे नाही म्हणून माघार घेतली.

मातोश्रीच्या नजरेत जर मी सक्षम उमेदवार नसेन, कोणत्याही जबाबदारीसाठी सक्षम नसेन, तर मी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. १९७९ पासून बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक म्हणून काम केले. या ४५ वर्षांत बरेच चढउतार आले. मी तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख पद भूषवले. सलग २५ वर्षे जिल्हा परिषदेवर निवडून आलो. बने म्हणाले की, माझ्याकडून बंड होणार नाही, असा शब्द उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे व विजय देसाई यांना दिला होता. शिवसेनाप्रमुख, कार्यकर्त्यांची माफी मागून थांबण्याचा निर्णय घेतोय. ४० आमदार सोडून गेले तेव्हासुद्धा माझ्याकडे कोणती जबाबदारी पक्षाने दिली नाही. लोकसभा निवडणुकीवेळी विनायक राऊत यांच्याकडे गेलो होतो, मला जबाबदारी द्या; पण मला कोणतेही पद दिले नाही; पण मी बाळासाहेबांचा सैनिक म्हणून मेहनत घेतली व सर्व ठिकाणी लीड देण्याचा प्रयत्न केला.

जनतेच्या समस्यांकडे बघा – मी सर्वच उमेदवारांना सांगतो की, जनतेच्या समस्यांकडे बघा. चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीशी राहू. माझा कधी बॉडीगार्डही नव्हता. जि. प. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मी पक्षाची इज्जत वाचवली. मला त्यावेळी राजीनामा दे सांगितले. मी दोन तासांत राजीनामाही दिला. पक्षाचा आदेश मानला. पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरण्याबाबत मला तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुखांनी कसलीही कल्पना दिली नाही, असे उदय बने यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular