26.1 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeChiplunचिपळूणमध्ये अभिनेते सयाजी शिंदेंच्या डायलॉगने प्रचारसभा गाजली

चिपळूणमध्ये अभिनेते सयाजी शिंदेंच्या डायलॉगने प्रचारसभा गाजली

'तुझे लिंबू खरे असेल तर माझा नारळ सुद्धा खरा आहे... तुझे भूत खरे असेल तर माझा देव नक्कीच खरा आहे.

‘तुझे लिंबू खरे असेल तर माझा नारळ सुद्धा खरा आहे… तुझे भूत खरे असेल तर माझा देव नक्कीच खरा आहे… आपल्या माणसातल्या शेखर निकम नावाच्या देवाला प्रचंड मताने विजयी करा…’ हा तेलगू चित्रपटातील गाजलेला डायलॉग तेलुगू भाषेत ऐकवत येथील प्रचारसभा सिनेअभिनते सयाजी शिंदे यांनी गाजवली… उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना दाद दिली. प्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे गुरुवारी चिपळूण येथे महायुतीचे उमेदवार आमदार शेखर निकम याच्या प्रचारासाठी आले होते. त्याच्याहस्ते शहरातील प्रचार कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर माटे सभागृहात सभा घेण्यात आली आणि ही सभा सयाजी शिंदे यांच्या डायलॉगने गाजली.

इथे तर सुपरस्टार प्रचारक – महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचारासाठी मी येथे आलो… निकमांचे हितचिंतक बघितल्यानंतर आणि त्यांचा जोश पाहून इथे तर सर्वच स्टार प्रचारक मला पहावयास मिळाले असे सयाजी शिंदे यांनी सांगताच सभागृहात जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. घरा घरात, माणसा-माणसात प्रचार करा आणि शेखर निकमांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. अभिनेते सयाजी शिंदे यांनी साध्या सरळ शब्दात बोलत होते आणि प्रत्येक वाक्यागणिक ते टाळ्या मिळवत होते. पुरुष प्रचारकाना ९० टक्के मार्क दिले. तर महिलांना १०० टक्के मार्क मी देईन, कारण काळजात जाण्याची कला ही फक्त याच महिलांकडे आहे आणि ती कला उपजत आहे. त्यामुळे लगेच पटते, त्यामुळे सर्वांनी हार्ट टू हार्ट प्रचार करा असे आवाहन त्यानी केले. शेखर निकम हा साधा माणूस… राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे दादा माणूस… साधा आणि दादा माणूस असतील तर तिथे सर्वसामान्य म उणसाचा फायदा निश्चित होणारच असे सयाजी शिंदे यांनी सांगताच पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला.

माझे इथे अनेक कलाकार ओळखीचे आहेत… पर्यावरण क्षेत्रातील मान्यवर ओळखीचे आहेत…आता राजकीय क्षेत्रातील लोकंही ओळखीचे होत आहेत. या सर्वांनी मला सांगितले, शेखर निकम यांचा विजय हा वनसाईड आहे. मी काही राजकारणी नाही, मला अन्य उमेदवारांविरोधात् बोलायचे नाही. मला चांगल्या माणसाच्या बाजूने उभे राहायचे आहेत. फकीर वृत्तीचे शेखर निकम आहेत. फकीर हा स्वार्थी नसतो राजकारण्यांनी या वृत्तीने वागले पाहिजे मला मात्र इथे शेखर निकम या वृत्तीचे पहावयास मिळाले असे सयाजी शिंदे म्हणाले. अरुंधती या तेलगू चित्रपटातील गाजलेला डायलॉग सयाजी शिंदे यांनी शेखर निकम याना उभे करून बोलून दाखविला. ‘तुझं लिंबू खरे असेल तर माझा नारळ खरा आहे, तुझे भूत खरे असेल तर माझा देव खरा आहे…म ाणसातल्या या देवमाणसाला प्रचंड मतांनी विजयी करा’ असे आवाहन करताच सभागृहात एकच जल्लोष सुरु झाला. एकाच डायलॉगने शेखर निकम यांची प्रचार सभा गाजली.

RELATED ARTICLES

Most Popular