22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeChiplunकोकरे गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश

कोकरे गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश

उमेदवार प्रशांत यादव म्हणाले आजचे हे वातावरण बघून मी भारावून गेलो आहे.

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच चिपळूण तालुक्यातील कोकरे जिल्हापरिषद गटात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. येथील अजित पवार गटाचे ताकदवान नेते अनिल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अडीचशेहून अधिक कार्यकर्त्यांनी थेट राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करून जोरदार धक्का दिला आहे. माजी आमदार रमेश कदम, उमेदवार प्रशांत यादव यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करत सर्वांना सन्मानाची वागणूक देण्याची ग्वाही यावेळी दिली. चिपळूण तालुक्यातील कोकरे जिल्हापरिषद गटातील कुटरे पंचायत समिती गणात महाविकास आघाडीच्या प्रचार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात बैठकीचे रूपांतर थेट मोठ्या मेळाव्यात झाले होते. प्रचंड अशी गर्दी उसळली होती. या जिल्हापरिषद गटात अनिल चव्हाण यांचे वर्चस्व राहिले आहे. त्यांनीच सर्वांना मोठा धक्का दिला. अनिल चव्हाण हे मूळचे राष्ट्रवादीचे परंतु अजितदादा पवार यांनी भाजप बरोबर हातमिळवणी करून उपमुख्यमंत्री झाले तेव्हा अनिल चव्हाण देखील अजितदादा यांच्या राष्ट्रवादीत सहभागी झाले होते.

परंतु ऐन निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि येगाव येथे झालेल्या बैठकीत सुमारे अडीचशेहून अधिक कार्यकर्त्यांना बरोबर घेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्या बरोबर राजाराम शेवले, दत्ताराम बने, निलेश अपंगे, राकेश तुळसणकर, संतोष भागडे, रवींद्र पंडित, मंगेश डिके, सोनू सावर्डेकर, रमेश घाग, कृष्णा ठोंबरे, बाळू तांदळे, सचिन गोसावी, अनंत तांबे, सुरेश गांगरकर, सुरेश गोताड, महेश डिके, महेंद्र शिगवण, सुभाष बोटके, निलेश चव्हाण, संतोष सोमिस्कर, लक्ष्मण धाडवे, गोपीनाथ चव्हाण, जयराम काणेकर, मंगेश पेंढाबकर, जनार्दन लाखन, रघुनाथ हेवले, राजू पवार, लक्ष्मण भागडे यांच्यासह अडीचशेहून अधिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला. त्यासर्वांचे माजी आमदार रमेश कदम, उम `दवार प्रशांत यादव, जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी पक्षात स्वागत केले.

विजयाची खात्री – यावेळी रमेश कदम म्हणाले अनिल चव्हाण सारखा आमचा दमदार कार्यकर्ता आज पुन्हा आमच्या बरोबर आला याचा मोठा आनंद मला आहे. विशेष म्हणजे तो एकटा आला नाही तर सोबत अडीचशेहून अधिक दमदार कार्यकर्त्यांना घेऊन आज पक्षात आलाय हे महत्वाचे आहे. अनिल चव्हाणची ताकद मला माहित आहे. तो एकदा का कामाला चिकटला की मग शेवटपर्यंत गप्प बसत नाही. त्याच्या व त्याच्या सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेशामुळे कोकरे जिल्हापरिषद गट्रात पक्षाला एक मजबूत ताकद मिळाली आहे. आगामी काळात त्याचे परिणाम निश्चीतपणाने दिसून येतील याची खात्री मला आहे असा विश्वास रमेश कदम यांनी यावेळी ब्यक्त केला.

कधीही अंतर देणार नाही – उमेदवार प्रशांत यादव म्हणाले आजचे हे वातावरण बघून मी भारावून गेलो आहे. आजची उपस्थिती तसेच अनिल चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला पक्षप्रवेश निश्चितच मला बळ देणारा आहे. मी सर्वांचा ऋणी आहे. आपले प्रेम आणि आशीर्वाद माझ्यापाठी कायम ठेवा. अनिल चव्हाण यांच्या बरोबर ज्यांनी ज्यांनी पक्षात प्रवेश केला आहे त्या सर्वांना मी खात्री देतो तुम्हाला कधीही अंतर देणार नाही. सदैव तुमचा सन्मान केला जाईल. तुम्हाला विश्वासात घेऊन पुढील वाटचाल केली जाईल आणि सर्वांना अभिमान वाटेल असे काम करून दाखवू असा विश्वास व्यक्त करत २० नोव्हेंबरला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्ह समोरील बटन दाबून आपले बहुमोल मत देऊन विजयी करा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

RELATED ARTICLES

Most Popular