25.1 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeChiplunचिपळुणात सीसीटीव्हीद्वारे १६६ मतदान केंद्रांवर नियंत्रण…

चिपळुणात सीसीटीव्हीद्वारे १६६ मतदान केंद्रांवर नियंत्रण…

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पर्यावरणाचा संदेश देणारा ग्रीन बूथ उभारला जाणार आहे.

चिपळूण विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे. मंगळवारी (ता. १९) सकाळी ७ वाजल्यापासून मतदान यंत्रे प्रत्येक मतदान केंद्रांवर पाठवण्यात येणार आहेत. एकूण ३३६ मतदान केंद्रापैकी चिपळुणात १७०, तर संगमेश्वर तालुक्यातील १६६ मतदान केंद्रांवर यंत्रे रवाना होतील. चिपळुणातील ११९, तर संगमेश्वरमधील ४५ मतदान केंद्रे सीसीटीव्हीच्या कक्षेत असणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी दिली. येथील प्रांताधिकारी कार्यालयात आज सायंकाळी पत्रकार परिषद झाली. यावेळी तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी विशाल भोसले उपस्थित होते. प्रांताधिकारी लिगाडे म्हणाले, चिपळूण विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ७६ हजार ६५ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ३४ हजार ८१३ पुरुष, तर १ लाख ४१ हजार १८३ महिला मतदार असून, ८५ वर्षांवरील ३ हजार ८१८, तर दिव्यांग १ हजार ७०३ मतदार आहेत. यावेळी ५ हजार १७ नवमतदारांनी नोंदणी केली आहे. चिपळूण मतदारसंघातील ३६ मतदान केंद्रांवर कोणतेच मोबाईल नेटवर्क नाही. १६८ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.

आत्तापर्यंत ८३५ पैकी ७८६ लोकांचे होम व्होटिंग घेण्यात आले आहे. ३३६ मतदान केंद्रांवर ३३६ पोलिस व तेवढेच होमगार्ड असणार आहेत, तर प्रत्येक मतदान केंद्रासाठी पाच कर्मचाऱ्यांच्या ३६४ टीम बनवण्यात आल्या आहेत. मतदारसंघात ९५.५७ टक्के व्होटर्स स्लिप वाटण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित लोकांना त्या लवकरच देण्यात येणार आहेत. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी सर्व मतपेट्या युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये आणण्यात येतील. त्या ठिकाणी २१ टेबल लावण्यात आले आहेत. त्या ठिकाणी मतदान यंत्र जमा केली जातील. रात्री १० वा. पर्यंत सर्व मतपेट्या दाखल होतील. त्यानंतर त्या स्ट्राँग रूममध्ये ठेवून स्ट्राँग रूम सील केले जाईल. मतदान यंत्रणा निर्भय व सुरक्षितपणे पूर्ण होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, चोख तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्भयपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणू निर्णय अधिकारी लिगाडे यांनी केले आहे.

सखी मतदानसाठी ग्रीन बूथ – लोकसभा निवडणुकीत शहरातील मुरादपूर येथील महाराष्ट्र हायस्कूलमधील सखी मतदान केंद्रात कोकणातील ग्रामीण संस्कृती दाखवण्यात आली होती; मात्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पर्यावरणाचा संदेश देणारा ग्रीन बूथ उभारला जाणार आहे. वनविभागाच्या मदतीने ही संकल्पना राबवली जाणार आहे. या ठिकाणी चित्ता, हरीण व हिरवीगार झाडी उभारली जाणार आहेत. पर्यावरणाशी संबंधित माहितीदेखील या उपक्रमाच्या माध्यमातून मतदारांना दिली जाणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular