मंगळवारी परशुराम घाटात पुन्हा एकदा ५ वाहनाचा अपघात घडला आहे… एकाच ठिकाणी पाच वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात घरडा कंपनीच्या बसचा समावेश असून यामधील १५ ते २० कर्मचारी जखमी झाले आहेत. अपघातानंतर घाटातील वाहतूक २ तास बंद झाली होती. याच ठिकाणी घडलेला हा दुसरा अपघात असून भविष्यात मोठे अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याची मागणी जोर धरत आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडला आहे. परशुराम घाटात ज्या ठिकाणी संरक्षण भिंत कोसळली आहे त्या ठिकाणी एकेरी वाहतूक सूरु आहे.
मंगळवरी दुपारी २.३० वा. च्या सुमारास चिपळूण शहरातून घरडा कंपनीचे कर्मचारी घेऊन बस कंपनीकडे निघाली होती. परशुराम घाटात बस एकेरी मार्गावर जात असताना समोरून मुबईच्या दिशेने कंटेनर वेगाने येऊन बसवर आदळला. कंटेनरच्या धडकेने बस गर्डरवरं जाऊन आदळली तर कंटेनरच्या मागे असणाऱ्या आयशर टेम्पोवर कंटेनर पलटी झाला. घरडा कंपनीच्या बेसच्या मागे एक कार होती आणि त्या मागे एक ट्रक होता. बसच्या मागे असणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्या.
१५ ते २० जण जखमी – घरडा वापरली कंपनीच्या गाडीत असणारे घरडाचे कर्मचारी या मध्ये जखमी झाले आहेत किमान पंधरा ते वीस कर्मचारी अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. खाजगी बस आणि कंटेनर यांच्यातील अपघातानंतर या मार्गावरची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. चिपळूण पोलीस, महामार्ग पोलिसांच्या प्रयत्नातून सुमारे दगोन ते अडीच तासाने या या मार्गावरची वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. दरम्यान या घाटात या ठिकाणी अपघात होण्याची ही दुसरी घटना आहे या ठिकाणी अपघाताच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून यावर ठोस उपाय योजना करण्यात आल्या नाहीत तर याच ठिकाणी मोठा अपघात घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.