25.2 C
Ratnagiri
Saturday, January 25, 2025

जिल्ह्यात घुसलेल्या बांगलादेशींचा शोध घेऊन वितरण मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून बांगलादेशी घुसखोर...

मालगुंड होणार आता पुस्तकांचे गाव मराठी भाषामंत्री उदय सामंत

रत्नागिरी तालुक्यातील पातील मालगुंड गावाला पुस्तकांचे गाव...

वाशिष्ठीतील गाळ उपशासाठी यंत्रसामुग्री वाढवा आमदार निकम

वाशिष्ठो नदीतील गाळ उपसा कामासाठी पुरेसा निधी...
HomeKokanफेंगल चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले रत्नागिरी, सिंधुदुर्गसह ६ जिल्ह्यांना अलर्ट

फेंगल चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले रत्नागिरी, सिंधुदुर्गसह ६ जिल्ह्यांना अलर्ट

फेंगल चक्रीवादळ येत्या २४ तासात आणखीन तीव्र होण्याची शक्यता.

फेंगल चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकले असून तामिळनाडूसह पुद्दुचेरीमध्ये त्याने मोठा हाहाकार माजवलाय. पुद्दुचेरीमध्ये मोठा कहर बघायला मिळाला. अनेक विमाने रद्द करण्यात आली आणि शाळांनी सुट्टी जाहीर केली. अनेक रस्ते जलमय झाले. या फेंगल चक्रीवादळाला प्रभाव महाराष्ट्रामध्येही दिसतोय. सकाळपासूनच ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. यासोबतच काही जिल्हांमध्ये पावसाची देखील शक्यता व्यक्त करण्यात आलीये. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात रत्नागिरी, सिंधुदुर्गसह ६ जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. मच्छिमारांना समुद्रात जावू नये अशा सुचना देखील हवामान विभागाने दिल्या आहेत. अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब आहे. याबाबत भारतीय हवामान विभागाचे पुण्याचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी व वर याबद्दलची माहिती शेअर केलीये. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून या चक्रीवादळामुळे थंडी कमी झाली. मागील काही दिवसांमध्ये थंडी चांगलीच वाढली होती.

सांगली, सातारा, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, स्त्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, वाशिम, हिंगोली, बीड आणि संभाजीनगर या जिल्हांमध्ये पावसाची शक्यता आहे. फेंगल चक्रीवादळ येत्या २४ तासात आणखीन तीव्र होण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलीये. फेंगल चक्रीवादळ सध्या दक्षिण किनारपट्टीवर आहे. यामुळेच त्याचा परिणाम वातावरणावर झाल्याचे बघायला मिळतंय. हवामान खात्यासह पंजाबराव डख यांनी देखील फेंगल चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राम ध्ये दिसणार असल्याचे म्हटले. बऱ्याचदा पंजाबराव डख यांनी हवामानाबद्दल दिलेले अंदाज खरे होताना दिसतात. पंजाबराव डख यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात. सहा जिल्ह्यांम ध्ये फेंगल चक्रीवादळाचा परिणाम ५ डिसेंबरला अधिक राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय.

गुरुवारी सातारा, पुणे, रत्नागिरी, लातूर, सांगली, कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आलाय. फेंगल चक्रीवादळातील पावसामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते, यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. फेंगल वादळाचा मोठा फटका चेन्नई विमानतळाला बसला. थेट अनेक विमाने रद्द करावी लागली. हेच नाही तर एक व्हिडीओ देखील चेन्नई विमानतळावरील व्हायरल होताना दिसला. फेंगल चक्रीवादळामध्ये एक विमान लँड करताना पूर्ण हलताना दिसले. काही वेळाचा तो चेन्नई विमानतळावरील व्हिडीओ नक्कीच धडकी भरवणारा होता. लोक त्या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसले.

RELATED ARTICLES

Most Popular