27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriटँकरच्या धडकेत निवळीतील तरुणाचा मृत्यू हातखंब्यात दुर्घटना

टँकरच्या धडकेत निवळीतील तरुणाचा मृत्यू हातखंब्यात दुर्घटना

दुचाकीला पाठीमागुन भरधाव टँकरने जोरदार धडक दिली.

मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरीतील हातखंबा येथील दर्याजवळ पाण्याच्या टँकरने दुचाकीस्वाराला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात निवळीतील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी दि. १३ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. टँकर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. शिशिर शांताराम रावणंग (३६, निवळी, रत्नागिरी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दुचाकीला धडक देणारा टँकर हा मुंबई गोवा महामार्गाचे काम करणाऱ्या एका कंपनीचा होता. शिशिर यांच्या दुचाकीला पाठीमागुन भरधाव टँकरने (एमएच ०५ बीए ३६७७) जोरदार धडक दिली. त्या धडकेत शिशिर दुचाकीवरून फेकला गेला. त्यात तो गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाला. या अपघातानंतर टैंकर चालक तत्काळ घटनास्थळावरुन पसार झाला. अपघात पाहताच, तेथे असणाऱ्या आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेतली.

गंभीर जखमी होऊन निपचित पडलेल्या शिशिर यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे दाखल करताच वैदकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघाताची खबर हातखंबा, निवळी तसेच रत्नागिरी शहर परिसरात पसरली. त्याच्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. टँकर चालकावर तत्काळ गुन्हा दाखल करून अटकेची मागणी करण्यात आली. शिशिर हा यापूर्वी रत्नागिरीत वीवो कंपनीमध्ये एरिया मॅनेजर म्हणून काम करत होता. अलीकडेच तो एअरटेल कंपनीत एरिया मॅनेजर म्हणून कामाला रुजू झालेला होता. शुक्रवारी रात्री ८.१५ वा. लांजा येथील आपले काम आटोपून तो निवळी येथील आपल्या घरी निघाला होता. यावेळी हा अपघात झाला. दरम्यानं टैंकर चालक चालकसोनु महतो (रा. झारखंड) याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिशिर त्याच्या कुटुंबियाचा आधार होता. आई, वडील, मोठा विवाहित भाऊ, भावजय अशा सर्वाची जबाबदारी तो सांभाळत होता. त्याच्या निधनाने कुटुंबियांवर दुः खाचा डोंगर कोसळला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास हे. कॉ. रुपेश भिसे करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular