25.6 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

सुनावणीपूर्वीच फेरसर्वेक्षणाला विरोध – शिवसेना ठाकरे गट

चिपळूण पालिकेने वाढीव घरपट्टीबाबत २८ सप्टेंबरपर्यंत हरकती...

ना. नितेश राणेंना मत्स्योद्योग तर गोगावलेंना रोजगार हमी मंत्रालय

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजताच शनिवारी रात्री...

प्राध्यापकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ गुहागरात निघाला मोर्चा…

गुहागर येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील ३ प्राध्यापकांना झालेल्या...
HomeRatnagiri'त्या' लंपट विस्तार अधिकाऱ्याचे निलंबन पाठीशी घालणाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

‘त्या’ लंपट विस्तार अधिकाऱ्याचे निलंबन पाठीशी घालणाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

महिला शिक्षिकांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे असभ्य शब्द वापरून लंपटगिरी करणाऱ्या त्या विस्तार अधिकाऱ्याला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मोठा दणका दिला आहे. २४ तासांत या अधिकाऱ्याचे निलंबन करा तसेच त्या अधिकाऱ्याला पाठीशी घालणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांसह (प्राथमिक) जिल्हा परिषदेतील त्या अधिकाऱ्याच्या मत्राचीदेखील चौकशी करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिले आहेत. महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमातून रत्नागिरी जिल्हयातील महिलांसाठी जनसुनावणी आयोजित केली होती. या जनसुनावणीला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासह जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार, पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड आदी उपस्थित होते.

१३८ केसेस सुनावणीला – यावेळी माहिती देताना राज्य म हिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांनी सांगितले की, आजच्या सुनावणीला एकूण १३८ केसेस दाखल झाल्या होत्या. त्यासाठी ४ पॅनल तयार करण्यात आले होते. कौटुंबिक कलह, लैगिंक छळ, बालविवाह आदी केसेस या सुनावणीदरम्यान पुढे आल्या.

लंपट अधिकाऱ्याचा विषय गाजला – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपोली चाकणकर रत्नागिरीत दाखल होताच काही महिला शिक्षिकांनी त्यांची भेट घेऊन त्या लंपट अधिकाऱ्याविरोधात लेखी तक्रारी दाखल केल्या. एका मागोमाग एक अशा तक्रारी येवू लागल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या चांगल्यांच संतापल्या त्यांनी साऱ्यांची हजेरी घेतली.

तक्रारींचा पाढा – महिला शिक्षिकांनी तक्रारींचा पाढा वाचून दाखवला त्या पाठोपाठ काही सामाजिक संघटनाही त्या लंपट अधिकाऱ्याविरोधात महिला आयोगाच्या अध्यक्षांना भेटल्या. हा अधिकारी किती त्रासदायक आणि महिलांसाठी धोकादायक आहे याची कैफियत समोर मांडली.

तात्काळ निलंबित करा – या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांनी या लंपट अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. तसेच या अधिकाऱ्याला पाठीशी घालणाऱ्या काही अधिकाऱ्यांची चौकशी करा. असे आदेश त्यांनी दिले.

तातडीची सुनावणी – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तात्काळ निलंबनाचे आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकारी एम.. देवेंदर सिंह यांनी उद्या गुरूवारी तातडीची सुनावणी लावली आहे. सकाळी ११.३० वा. या प्रकरणात सुनावणी घेऊन त्या अधिकाऱ्याच्या निलंबनाचे संकेत दिले आहेत.

त्या दोघांची चौकशी – त्या लंपट अधिकाऱ्याचे कारनामे यापूर्वीदेखील उघडकीस आले आहेत. मात्र वेळोवेळी त्याला पाठीशी घालण्याचा प्रकार झाला आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागात एक विस्तार अधिकारी त्याचा मित्र असल्याने शिक्षणाधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याच्या सर्व कृत्यांवर पडदा टाकण्याचे काम झाले आहे. त्यामुळे त्या लंपट अधिकाऱ्याच्या मित्राची आणि शिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी होईल असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिले.

जिल्हयात क्राईम रेट कमी – दरम्यान जिल्हयाचा आढावा घेताना रत्नागिरी जिल्हयात क्राईम रेट फार कमी आहे. हा क्राईम रेट कमी ठेवण्यात जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांची महत्वाची भूमिका असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधिक्षकांचे विशेष ‘कौतुक केले.

बलात्काराचे २३ गुन्हे – यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की रत्नागिरी जिल्हयात बलात्काराचे २३ गुन्हे दाखल असून सर्व गुन्हे उघडकीस आले आहेत. तर बाल लैगिंक अत्याचाराचे ३५ गुन्हे दाखल असून हे गुन्हेदेखील उघडकीस आले आहेत. २६३ व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. त्यातील २२३ व्यक्ती मिळून आल्या आहेत. तर ४९ मुली नापत्ता झाल्या होत्या त्यातील ४८ मुली मिळून आल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular