22.7 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...

चिपळुणात कचरा संकलनाचा प्रश्न गंभीर…

कोकणातील भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन त्या क्षमतेच्या...
HomeKhedगुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

पाईपमधून गरम, हिरव्या पाण्याचा फवारा उडाला.

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे पाणी पाईपमधून वेगाने बाहेर पडले. हे गरम पाणी बँक ऑफ इंडियाजवळ उतरणारे प्रवासी आणि गाडीतील अन्य प्रवाशांच्या अंगावर उडून २५ जण भाजले. या गोंधळात एक महिला गाडीतून उतरताना पडून जखमी झाली. यातील दोघा जखमींवर ग्रामीण रुग्णालय गुहागर येथे उपचार सुरू आहेत. असगोलीहून प्रवाशांना घेऊन येणारी बस बँक ऑफ इंडियाजवळ धांबली असताना हा अपघात घडला. आज सकाळी १० वाजता गुहागरातून असगोलीला गेलेली मिडीबस सकाळी १०.३० च्या सुमारास गुहागर खालचापाट येथील बँक ऑफ इंडिया समोर आली. यावेळी मिडीबसमध्ये सुमारे ४० प्रवासी होते. बँकेत कामाला जाणाऱ्या मंडळींना उतरविण्यासाठी दिडिबस थांबली. त्याचवेळी मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटला. पाईपमधून गरम, हिरव्या पाण्याचा फवारा उडाला. यामुळे २५ जणांचे पाय भाजले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. काहीतरी अघटित घडेल या भीतीने गाडीतील प्रवासी बाहेर पडण्यासाठी धावपळ करू लागले. या धावपळीत दळणासाठी आणलेला डबा घेऊन उतरणाऱ्या एका वयस्क महिलेचा तोल गेला आणि ती गाडीबाहेर रस्ता आणि गटार यामध्ये पडली. आणखी एक महिलाही या धावपळीत घसरून पडली. या दोन महिलांना गुहागरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले.

अपघाताचे वृत्त कळताच शिवसेनेचे नेते राजेश बेंडल यांनी रुग्णालयात जाऊन या महिलांची भेट घेतली. गुहागर शहरापासून ५ किमी अंतरावर, एका बाजूला असलेल्या असगोली गावातील महिला, पुरुष, विद्यार्थी, नोकरदार अशी शेकडो मंडळी दररोज गुहागरात येत असतात. या ग्रामस्थांसाठी एसटी महामंडळ मिडीबसद्वारे सेवा देते. या गावात जाणारा अरुंद रस्ता, मोठ्या गाडीवर कॅरिअर असल्याने झाडाच्या फांद्या लागणे, वेगवेगळ्या वायर तुटण्याचा धोका तसेच गुहागर बाजारपेठ नाक्यातील तीव्र वळण यामुळे एसटीची मोठी गाडी असगोली गावात पाठवली जात नाही. सध्या उपलब्ध असलेली एकमात्र मिडीबस केवळ गुहागर आगारातील तांत्रिक कर्मचाऱ्यांमुळे सुरू आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडे अनेकवेळा मागणी करूनही छोट्या बस गाड्यांची व्यवस्था महामंडळाने गुहागरसाठी केलेली नाही.

RELATED ARTICLES

Most Popular