26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriरत्नागिरीत 'सीएनजी'ची गळती; परिसरात भीती

रत्नागिरीत ‘सीएनजी’ची गळती; परिसरात भीती

व्हॉल्व्हमधूनच गॅस गळती होत असल्याचे लक्षात आले.

शहरातील हिंदू कॉलनी येथे मोटारीमधील सीएनजीच्या टाकीतून गॅस गळती झाल्याने परिसरातील नागरिकांची भीतीने गाळण उडाली. पालिका आणि एमआयडीसीची अग्निशमन पथके तत्काळ दाखल झाली. त्यांनी टाकीच्या व्हॉल्व्हमधून होणारी गळतीची तीव्रता कमी करण्यासाठी त्यावर भिजलेले गोणपाट टाकले. गळती थांबविण्याचा दुसरा कोणताही उपाय नसल्याने परिसरामध्ये सर्वांना खबरदारीच्या सूचना केल्या. आठ किलो सीएनजी हवेत सोडून देऊन टाकी रिकामी झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. शहरातील हिंदू कॉलनी येथील कलानिकेतन या सोसायटीमध्ये हा प्रकार घडला. सोसायटीबाहेर रस्त्याला लागून मोटार लावली होती. मोटारमालकांनी आठ किलो सीएनजी भरून टाकी फुल्ल केली होती. गाडी पार्क करून ठेवल्यानंतर काही वेळात गाडीतून गॅस गळती होत असल्याचा आवाज येत होता. काहींच्या ते लक्षात आल्यानंतर मालक नाचणकर यांना त्याची माहिती दिली. त्यांनी दबकत दबकत येऊन गाडीचे सर्व दरवाजे उघडे ठेवले. तेव्हा मोठ्याने गळतीचा आवाज येत होता.

त्यांनी टाकीचा कॉक बंद केला, परंतु व्हॉल्व्हमधूनच गॅस गळती होत असल्याचे लक्षात आले. त्यांनी सीएनजी कंपनीला फोन करून विचारून घेतले, परंतु व्हॉल्व्हमधील गळती असल्याने त्यावर काही पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. या दरम्यान परिसरामध्ये गॅस गळतीची वार्ता पसरली होती. नागरिक सुरक्षित ठिकाणी राहून हा सर्व प्रकार पाहात होते. रत्नागिरी पालिका आणि एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. काही वेळात हे दोन्ही बंब घटनास्थळी दाखल झाले. एमआयडीसीच्या फायरमननी पाहणी केल्यावर टाकीमधून नाही, तर व्हॉल्व्हमधून गॅस गळती सुरू असल्याचे त्यांच्याही लक्षात आले. त्याला काही पर्याय नसल्याने भिजलेल्या गोणपाटाने व्हॉल्व्ह गुंडाळून ठेवत त्याची तीव्रता कमी केली. गळतीमुळे परिसरामध्ये गॅस गळतीचा वास येत होता. जवळपास मोबाईल कॉल घेणे, तसेच वाहनांना मज्जाव केला. बिल्डिंगमध्येही माचीस पेटवू नका किंवा विजेचे बटण दाबू नका, अशा सूचना दिल्या होत्या. सुमारे दोन तास हा प्रकार सुरू होता. सीएनजीची टाकी रिकामी झाल्यानंतर त्या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

RELATED ARTICLES

Most Popular