27.9 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

‘एमआयडीसी हद्दपार’चे झळकले फलक, वाटदवासीयांचे गणरायाला साकडे

एमआयडीसी हद्दपार करा, असे फलक वाटद पंचक्रोशीतील...

व्यापाऱ्यांवर गणेश प्रसन्न, २० कोटींची उलाढाल…

ऑनलाइन खरेदीचा कल वाढत असतानाही गणेशोत्सवानिमित्त रत्नागिरी,...

गणेशोत्सवासाठी गावी आलेला तरूण पुराच्या पाण्यात बेपत्ता

गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी आलेला एक तरूण वहाळाला...
HomeRatnagiriहापूसच्या उत्पादनात रत्नागिरी देशात ब्रँड

हापूसच्या उत्पादनात रत्नागिरी देशात ब्रँड

२०१८ ला हापूस आंब्याला जीआय टॅग मिळाला आहे.

केंद्र शासनाच्या ‘वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट अॅवॉर्ड २०२३-२४’ साठी देशातील ६० जिल्ह्यांना नामांकन मिळाले. राज्यातील १४ जिल्ह्यांना ते मिळाले असून, त्यामध्ये रत्नागिरीचा समावेश झाला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या इन्व्हेस्ट इंडियाचे सहायक व्यवस्थापक ताशी दोरजे शेर्पा यांनी आज याबाबत बैठक घेतली. शिवाय पडताळणीही केली. जिल्ह्याने केलेल्या कामगिरीबद्दल रत्नागिरी जिल्हा हापूस आंबा उत्पादनात देशात एक ब्रँड झाला आहे, असे गौरवोद्‌गार त्यांनी काढले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, ‘आंब्याबरोबरच काजू, नारळ, कोकम आणि मासे ही जिल्ह्याची उत्पादने आहेत. २०१८ ला हापूस आंब्याला जीआय टॅग मिळाला आहे. राज्यामध्ये १६२.०८ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये आंबा क्षेत्र आहे. त्यातून ४६.३.१७ हजार टन आंबा उत्पादन होते.

हेच प्रमाण कोकण विभागात १२६.४१ हजार हेक्टर लागवड क्षेत्रामध्ये २१३.३७ हजार टन आंबा उत्पादन होतो. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ६७.७९ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये आंब्याची लागवड आहे. त्यातून १२३.०६ हजार टन आंबा उत्पादन होते.’ केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या इन्व्हेस्ट इंडियाचे सहायक व्यवस्थापक श्री. शेर्पा म्हणाले, ‘देशातील ६० जिल्ह्यांतील आणि राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश आहे. क्यू आर कोड, मोबाईल कुलिंग युनिट यांसारखी चांगली कामगिरी आणि खूप चांगले काम तुम्ही सर्वांनी केले आहे. हापूस आंब्याच्या संदर्भात रत्नागिरी हा एक देशात ब्रँड झाला आहे.’बैठकीला एमएसएमईचे मिलिंद जोशी, डीआयसीचे व्यवस्थापक संकेत कदम, डॉ. विवेक भिडे, माविमचे जिल्हा समन्वयक अंबरिश मिस्त्री, हापूस आंबा उत्पादक संघाचे मुकुंदराव जोशी आदी उपस्थित होते. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश हणबर यांनी स्वागत करुन सर्वांचे आभार मानले.

हे हापूसची सर्वाधिक आयात करणारे देश – कुवेत, संयुक्त अरब अमिराती, युनायटेड किंग्डम, कतार, ओमान, युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका, बहरिन आणि कॅनडा

दृष्टिक्षेपात हापूसविषयक कामगिरी – २०२२-२३ ला जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रात लागवड. १ लाख २३ हजार ६८ टन आंबा उत्पादन. रत्नागिरी जिल्हा प्रथम क्रमांकावर राहिला. २०२२-२३ मध्ये रत्नागिरीमधून १४५.९८ लाख आंबा निर्यात. २०२३-२४ वर्षासाठी रत्नागिरीमधून २५०.८६ लाख उत्पन्न

RELATED ARTICLES

Most Popular