27.5 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeChiplunचिपळुणातील तरूणीचा पुण्यामध्ये खून, प्रियकराने केला गेम

चिपळुणातील तरूणीचा पुण्यामध्ये खून, प्रियकराने केला गेम

शुभदाचे खोटे बोलणे त्याच्या जिव्हारी लागले होते.

चिपळूणमधील तरुणीचा प्रेमप्रकरण आणि पैशाच्या व्यवहारातून पुणे येथे खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शुभदा शंकर कोदारे (२८, मुळ चिपळूण, स्थायिक कराड, नोकरी निमित्त पुणे बालाजी नगर, कात्रज) असे खून करण्यात आलेल्या तरुणीचे नाव असल्याची माहिती पोलीसांकडून पत्रकारांना देण्यात आली. याप्रकरणी कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय २८, रा. खैरैवाडी, शिवाजीनगर, मूळ उत्तर प्रदेश) या संशयित आरोपीविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत पोलीसांकडून पत्रकारांना देण्यात आलेल्या माहितीनुसार अधिक वृत्त असे की, शुभदा मूळची चिपळूण येथील असून तिचे वडील व्यवसाय निमित्ताने कराड येथे स्थायिक आहेत. ती नोकरीमुळे पाच वर्षांपासून पुण्यात राहत होती. सन २०२२ पासून विमाननगर येथील डब्लूएनएस कंपनीत काम करत असताना, कृष्णा आणि शुभदा या दोघांची ओळख झाली.

कृष्णा हा लिपिक पदावर तर शुभदा एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती. पुढे दोघांचा चांगला परिचय झाला. त्यातून प्रेम संबंध जुळले. शुभदाने आपले आपले वडील आजारी असल्याचे सांगून त्यांच्या उपचारांसाठी कृष्णा याच्याकडून वेळोवेळी ४ लाख रुपये घेतले. ती सतत पैसे मागत असल्याने कृष्णाला संशय आला. अडीच महिन्यांपूर्वी त्याने थेट कराड गाठून तिच्या वडिलांची भेट घेतली. त्यावेळी आपले पैसे शुभदाने वडिलांच्या उपचारांच्या नावाखाली खाल्ल्याचे समजले, अशी माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली. शुभदाचे खोटे बोलणे त्याच्या जिव्हारी लागले होते. त्या रागातूनच कृष्णाला शुभदाला अद्दल घडवायची होती.

मंगळवारी येरवाडा येथील डब्ल्यू एन. एस. कंपनीच्या पार्किंगमध्ये सायंकाळी ६ वाजता कृष्णा याने तिच्यावर सपासप वार केले. वाद वाढल्याने रागाच्या भरात कृष्णाने जोरात ४-५ वार तिच्या हातावर केले. हे वार इतके जोरात होते की, त्यात शुभदाच्या हाताच्या नसा पूर्णपणे तुटल्या. तिला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात ‘आले. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला आणि कार्डियाक अटॅक येऊन तिचा मृत्यू झाला.

RELATED ARTICLES

Most Popular