24.1 C
Ratnagiri
Wednesday, February 5, 2025

ना. नितेश राणे आता भाजपचे रत्नागिरी जिल्हा संपर्कमंत्री

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री...

पुन्हा केवायसीचा कार्डधारकांमागे ससेमिरा, शिधापत्रिकाधारकांतून नाराजी

रेशनकार्ड आधार ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना शासनाकडून...

पालू लघुपाटबंधारे योजनेला मंजुरी, किरण सामंत यांचा पुढाकार

उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त भागात पहिला टँकर सुरू कराव्या...
HomeRatnagiriसमुद्रात एलईडी लाईट पुरवणारी बोट पकडली, कस्टमच्या गस्ती पथकाची कारवाई

समुद्रात एलईडी लाईट पुरवणारी बोट पकडली, कस्टमच्या गस्ती पथकाची कारवाई

या बोटीची कागदपत्रेही संशयास्पद आहेत.

सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) गस्ती पथकाने समुद्रात एलईडी लाईट पुरवणारी बोट पकडली आहे. यावर मोठे जनरेटर, हजार, ८०० वॉटचे हंडी व एलईडी बल्बसह, खलाशी, तांडेल यांना पकडून हा गुन्हा मत्स्य विभागाकडे वर्ग केला जाणार आहे. २० वावाच्या बाहेर हे लोक हा व्यवसाय करतात; परंतु आत १० वावामध्ये ते एलईडी पुरविण्यासाठी आले असताना त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे. या बोटीची कागदपत्रेही संशयास्पद आहेत. कस्टम विभागाचे सहायक आयुक्त संदीप कृष्णा, अधीक्षक पवन राठी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजेश लाडे, रमेश गुप्ता व ८ जणांचे पथक गस्तीसाठी गेले होते. गस्त घालताना या पथकाला सर्वत्र एलईडी लावलेली नौका दिसून आली. केंद्र शासनाने एलईडी बल्बद्वारे होणाऱ्या मासेमारीला बंदी घातली आहे. बेकायदेशीर हा प्रकार सुरू असल्याने कस्टमने या बोटीवर ताबा घेऊन त्याची चौकशी केली. तेव्हा वेगळाच प्रकार पुढे आला. ही मासेमारी करणारी बोट नसून मासेमारीसाठी लागणारी एलईडी बल्ब पुरवणारी बोट होती.

बोटीवर सुमारे ८ लाखांचा मोठा जनरेटर, हजारोचे वेगवेगळे बल्ब, ६०० लिटर डिझेल आढळले म्हणून त्यांच्यावर कस्टमने कारवाई केली. कस्टम विभागाने चौकशी केली असता ही बोट पालघर-डहाणूची आहे. त्याच्या मालकाकडे चौकशी केल्यानंतर आपण ही बोट ट्रान्स्फर केल्याचे त्यांनी सांगितले; परंतु बोटीचा नंबर वेगळा आणि कागदपत्रांवरील नंबर वेगळा असल्याने बनावट कागदपत्र असल्याचा कस्टमचा संशय आहे. त्यामुळे या बोट मालकावर वेगळा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. दोन महिन्यांपासून समुद्रात हा नवा व्यवसाय सुरू असल्याचे तीन खलाशी आणि एका तांडेलने सांगितले. भाड्याने एलईडी लाईट पुरवण्याचा हा नवा फंडा काही मच्छीमारांनी सुरू केल्याचा उघड झाल्याचे कस्टमचे निरीक्षक लाडे यांनी सांगितले.

कागदपत्रे संशयास्पद – आठ लाखांचा जनरेटर, हजार, ८०० वॉटचे हंडी व एलईडी बल्बसह खलाशी, तांडेल यांना पकडून हा गुन्हा मत्स्य विभागाकडे वर्ग केला जाणार आहे. २० वावाच्या बाहेर हे लोक हा व्यवसाय करतात; परंतु आत १० वावामध्ये ते एलईडी पुरविण्यासाठी आले असताना त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे. या बोटीची कागदपत्रेही संशयास्पद आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular