29.7 C
Ratnagiri
Wednesday, February 5, 2025

राजापूर पालिकेच्या गोठ्याची दुरवस्था

तीव्र उतार आणि नागमोड्या वळणांच्या राजापूर शहरातील...

गावाचा सर्वांगीण विकास करणार – आ. शेखर निकम

गावाच्या विकासासाठी निधी, योजना आणि आवश्यक सुविधा...
HomeKhedखेडमधील जगबुडी नदी झाली प्रदूषित

खेडमधील जगबुडी नदी झाली प्रदूषित

नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातोय.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक प्रमुख नदी असलेली जगबुडी नदीची अवस्था त्या नदीतून वाहणाऱ्या कचऱ्यामुळे अत्यंत बिकट झाली आहे. हि नदी आहे कि नाला असा प्रश्न सर्वांना पडला असून प्रदूषित झालेल्या या नदीचा फटका जलचरांना देखील बसू लागला आहे. गेल्या वर्षभरात चार मगरींचा मृत्यू या नदीत झाल्यामुळे आता चिंता व्यक्त केली जात आहे. कोकणातील सौंदर्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या नेहमीच भर टाकतात. मात्र आज त्याच नद्या प्रदुषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक प्रमुख नदी असलेली जगबुडी नदीची प्रदूषणामुळे बिकट अवस्था झालेली पाहायला मिळत आहे. या नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातोय त्यामुळे कचऱ्याचे ढीगच्या ढीग या बारमाही वाहणाऱ्या नदीतून वाहताना दिसत आहेत. आश्चर्याची गोस्ट म्हणजे या नदीच्या पात्रात तरंगत असलेल्या इतर कचऱ्यामध्ये औषधांच्या रिकाम्या बाटल्या, सलाईनच्या बाटल्या, इंजेक्शनच्या नळ्या असा जैविक कचरा देखील पाहायला मिळत आहे.

मध्याच्या रिकाम्या बाटल्यांचा तर खचच्या खच या नदीपात्रात तरंगताना पाहायला मिळत आहे, जगबुडी नदीचे पात्र पाण्यापेक्षा जास्त कचऱ्याने च भरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खेड मधील जगबुडी नदीत झालेल्या प्रदूषणाचा फटका नदीतील जलचरांना पण बसला आहे. या नदीत अनेक महाकाय मगरीचे वास्तव्य आहे मात्र गेल्या. वर्षभरात या जगबुडी नदीत वास्तव्याला असणाऱ्या चार मगरीच्या पिल्लांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत 1, याच नदीच्या पात्रातून खेड शहर, भोस्ते, वेरळ, अलसुरे, निलिक या एका शहरासह चार गावांच्या नळपाणीयोजना देखील आहेत. हेच प्रदूषित पाणी लोकांच्या पाण्यामध्ये गेले तर रोगराई तसेच साथीचे रोग पसरण्याची भीती देखील नाकारता येत नाही. या नदीमध्ये दररोज परीट समाजाचे लोक कपडे धुण्यासाठी येतात. म ात्र प्रदूषित पाण्यामुळे त्यांना देखील मोठ्या सम स्यांना तोंड द्यावे लागत आहे.

दापोली, मंडणगड आणि खेड चे रेल्वे स्थानक याच परिसरात आहे त्यामुळे मुंबईतून आलेले लाखो पर्यटक आणि नागरिक खेड ला रेल्वे स्टेशन मध्ये उतरल्यानंतर दापोली आणि मंडणगड ला जाताना याच नदीला पार करून जातात मात्र कोकणात आल्याआल्या या नदिची अवस्था पाहून पर्यटक देखील थक्क होताना दिसत आहेत. गेल्याच वर्षी या नदीमध्ये असणाऱ्या महाकाय मगरीच्या वास्तव्यामुळे नदीचा पर्यटनात्मक दर्जा वाढण्यासाठी आठ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली होती. मात्र वस्तू स्थिती पाहता या कचऱ्याच्या प्रदूषणामुळे या नदीचे नदीपण हरवत चालले असून याचा फटका, जलचर, पिण्याच्या पाण्यावर आणि पर्यटनावर देखील बसला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular