26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriधरण असूनही वेरवलीकर पाण्यापासून वंचित…

धरण असूनही वेरवलीकर पाण्यापासून वंचित…

२१.६८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची क्षमता आहे.

करोडो रुपये खर्जून आणि जवळपास ४० वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी वेरवली बेर्डेवाडी येथील धरण प्रकल्पातून वेरवली गावाला आजतागायत पाण्याचा एकही थेंब मिळालेला नाही. धरणाचे काम सुरू होऊन एक पिढी संपली; मात्र पाण्याचा पत्ता नसल्याने धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी परिस्थिती सध्या वेरवली ग्रामस्थांची आहे. १९८३ ला भूमीपूजन होऊन वेरवली बेर्डेवाडी या ठिकाणी धरणाच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर या धरणाच्या कामाला सुरुवात होऊन काम पूर्ण झाल्यानंतर गेल्या ४० वर्षांच्या कालावधीत आजतगायत पाण्याचा एक थेंबही वेरवली गावाला मिळालेला नाही. उलट धरण जवळ असूनही दरवर्षी वेरवली गावातील डोळसवाडी, गुरववाडी, भालेकरवाडी, सुतारवाडी बौद्धवाडी येथील ग्रामस्थांना मार्चपासून ते जूनपर्यंत पाणी विकत आणण्याची वेळ येते. येथे राहाणारे ग्रामस्थ श्रीकृष्ण सरदेसाई यांचे घर धरणापासून अवघ्या १ किमी अंतरावर आहे; मात्र त्यांनाही पाण्याची प्रतीक्षा करावी लागते आहे.

दरवर्षी कालवा किंवा पाईपलाईनसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च पडलेला असताना ग्रामस्थांना पाणी मिळणे सोडाच; परंतु शासनालाही यातून एक रुपयांचे उत्पन्न मिळालेले नाही. त्यामुळे या धरण प्रकल्पाचा नेमका उद्देश काय आहे? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. येथील ग्रामस्थ सरदेसाई यांनी सांगितले, कालव्याची उंची वाढवणे किंवा अन्य कामासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येतात; पण पाण्याचा पत्ता नसल्याने कंत्राटदार आणि अधिकारी यांच्या फायद्यासाठी हे धरण बांधले आहे का? या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासाठी आणि धरणाच्या पाण्यासाठी येथील ग्रामस्थ श्रीकृष्ण सरदेसाई यांच्या नेतृत्त्वात यांनी आता थेट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच त्यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहेत.

२१.६८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची क्षमता – तालुक्यातील वेरवली बुद्रुक बेर्डेवाडी हे लघुपाटबंधारे प्रकल्पांतर्गत ६०८.५० मीटर लांबीचे, तर ५५. ३६ मीटर उंचीचे धरण बांधले आहे. या धरणामध्ये २१.६८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा साठवण्यात येणार आहे. यासह धरणातून मुख्य कालवा काढण्यात आला असून, त्याची १४ मीटर लांबी आहे. या धरणाच्या माध्यमातून वेरवली बुद्रुक परिसरातील १०८१ हेक्टर क्षेत्र जमीन सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे.

RELATED ARTICLES

Most Popular