24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriएसटीचा प्रवास आजपासून महागला तब्बल १५ टक्के भाडेवाढ लागू

एसटीचा प्रवास आजपासून महागला तब्बल १५ टक्के भाडेवाढ लागू

दिवसेंदिवस डिझेल, सीएनजीचे दर वाढत चालले आहेत.

एसटीची इतकी मोठी भाडेवाढ राज्य सरकारला का करावी लागली, याबद्दल परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक म्हणाले, गुरूवारी (२३ जानेवारी) प्राधिकरणाची बैठक पार पडली. त्यात लोकप्रतिनिधींचा सहभाग नसतो.. गृह खात्याचे प्रधान सचिव, परिवहन खात्याचे प्रधान सचिव आणि अर्थ खात्याचे प्रधान सचिव या तिघांच्या समितीची बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. एसटीची भाडेवाढ अनेक वर्षांपासून प्रलंबित होती, ती १४.९७ टक्क्‌यांनी वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून ती लागू होत आहे. प्रत्येक वर्षी भाडेवाढ अपेक्षित रिक्षा आणि टॅक्सीचीदेखील दरवाढ १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे, ती ३ रुपये दरवाढ करण्यात आली आहे. दिवसेंदिवस डिझेल, सीएनजीचे दर वाढत चालले आहेत. प्रत्येक वर्षी खरंतर ही भाडेवाढ अपेक्षित असते. परंतु, गेल्या तीन-चार वर्षांपासून ही करण्यात आलेली नसल्या कारणाने एसटीच्या भाड्यात एकत्रित १४.९७ टक्के वाढ करण्यात आली आहे.

दिवसाला ३ कोटीचा तोटा – एसटी महामंडळाची परिस्थिती आज काही चांगली नाहीये. एसटीचे उत्पन्न आहे, त्यापेक्षा खर्च अधिक आहे. त्यामुळे दिवसाला ३ कोटी रुपयांचं नुकसान एसटी महामंडळाला होतं. त्यामुळे ही भाडेवाढ अपरिहार्य आहे. प्रवाशांना सुविधा द्यायच्या असतील, तर या गोष्टीची गरज असणार आहे. कारण दिवसेंदिवस डिझेल, सीएनजी आणि बसची दुरूस्तीचा खर्च वाढू लागला आहे, असेही सरनाईक म्हणाले. ‘मी जेव्हा परिवहन खात्याची बैठक घेतली. त्यावेळी हेच सूचवलं होतं की, एकत्रितपणे भाडेवाढ करण्याऐवजी जर दरवर्षाला ठराविक भाडेवाढ केली, तर सर्वसामान्य प्रवाशांना भुर्दंड पडणार नाही. प्रवाशांनाही ते अपेक्षित असेल. आता केलेल्या भाडेवाढीमुळे एसटी महामंडळाचं जे दररोज नुकसान होतं आहे, ते कमी होईल, अशी अपेक्षा जा. सरनाईक यांनी व्यक्त केली.

महिलांना ५० टक्के सवलत – शुक्रवारी मध्यरात्री एसटी महामंडळाची १४.९७ टक्के भाडेवाढ अंमलात येत असून महिला सन्मान योजनेबाबतही परिवहनमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. आंमच्याच सरकारने ज्या सवलतीच्या योजना जाहीर केल्या आहेत, त्यामध्ये कोणतीही कटौती होणार नाही. लाडक्या बहिणींना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत कायम राहील, असेदेखील ना. सरनाईक यांनी सांगितले. ५० टक्के सवलतीमुळे एसटीचे उत्पन्न वाढले असा दावादेखील त्यांनी केली.

प्रवासी नाराज – दरम्यान एसटीने अजूनही गोरगरिब जनताच प्रवास करते. अशावेळी या भाडेवाढीविषयी प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. एका बाजूला भाडेवाढ करताना सुविधांच्या नावाने बोंब आहे. गाड्या वेळेवर सुटत नाहीत. त्याबाबतही महामंडळाने योग्य तो निर्णय घ्यावा अशी अपेक्षा अनेक प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular