31.2 C
Ratnagiri
Thursday, February 13, 2025

शिवभोजन थाळी योजनेला घरघर, केंद्रे पडली बंद

गरीब मजूर, कामगारांची उपासमार टाळण्यासाठी शासनाने अवघ्या...

बिले रखडल्याने चिपळुणात ठेकेदारांची बांधकाम कार्यालयावर धडक

ठेकेदारांच्या थकीत देयकांसंदर्भात येथील ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम...

रत्नागिरीतील मच्छिमारांच्या समस्यांकडे राणेंचे वेधले लक्ष

रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदराचा विकास केला जात असून...
HomeRatnagiriरत्नागिरीत उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राजकीय भूकंप?

रत्नागिरीत उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राजकीय भूकंप?

१५ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीत येणार आहेत.

आजचा हा पक्षप्रवेश सारा महाराष्ट्र पाहतोय. मिशन शिवधनुष्य काय आहे? हे आजपासून दिसायला सुरुवात झाली आहे. आजचा प्रवेश सोहळा हा ट्रेलर आहे, असली पिक्चर १५ फेब्रुवारीला पहायला मिळेल. त्यादिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीत येणार असून त्यांच्या उपस्थितीत माजी आमदार, खासदारकीचे उमेदवार तसेच उबाठाचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतील, असा दावा शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी केला आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारीला रत्नागिरीत राजकीय भूकंप होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शुक्रवारी रत्नागिरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला. माजी तालुकाप्रमुख बंड्याशेठ साळवी यांच्या नेतृत्त्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर आपल्या भाषणात ना. सामंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

अनेकांना धक्का – ना. सामंत म्हणाले की, या पक्षप्रवेशामुळे अनेकांना धक्का बसणार आहे. २ वर्षांपासून आमच्यात बैठका सुरू होत्या. मी बंड्याशेठ साळवी यांना वारंवार सांगत होतो, एकनाथ शिंदेंचे हात बळकट करूया, कोकणची ताकद त्यांना देऊया. मात्र आज खऱ्या अर्थाने विकासाच्या दृष्टीने बंड्याशेठ साळवी यांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे.

आपला नेता भावूक – आपला नेता हा फार भावूक आणि संवेदनशील आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेने ८० जागा लढवल्या. त्यातील ६० जागा आपण जिंकल्या. या तालुक्यांत ज्यांना ७० हजार मते मिळाली त्यांना १७ हजारांवर आणूया. नवे-जुने वाद होणार नाहीत, याची ग्वाही मी देतो. भविष्यात एकत्रित काम करूया असे आवाहन ना. उदय सामंत यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत करताना केले.

तर आपलाच झेंडा फडकेल – आजच्या पक्षप्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ११ ही जिल्हा परिषद गट एकहाती काबिज करूया. तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत महायुती म्हणून काम करीत असताना आपला झेंडा कसा फडकेल? यासाठी एकजुटीने काम करूया असे ते म्हणाले.

१५ फेब्रुवारीला बडा धमाका – ते पुढे म्हणाले की, राजकीय कटुता असली तरी वैयक्तिक कटुता आम्ही ठेवली नाही. अजूनही फार मोठे धमाकें रत्नागिरीत व्हायचे आहेत. १५ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीत येणार आहेत. यावेळी सर्वात मोठा धमाका होणार असून माजी आमदार, लोकसभा निवडणूक लढविणारा एक बडा नेता यांच्यासह उबाठाचे अनेक पदाधिकारी प्रवेश करणार असल्याची माहिती ना. सामंत’ यांनी दिली. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, नगर परिषद या. शिवसेनेच्या असतील, असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

Most Popular