22.7 C
Ratnagiri
Tuesday, December 9, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRajapurस्वतंत्र तालुका निर्मितीच्या हालचाली रायपाटण की पाचल

स्वतंत्र तालुका निर्मितीच्या हालचाली रायपाटण की पाचल

प्रशासनाकडून आता थेट ग्रामस्थांची मते जाणून घेतली जाणार आहेत.

भौगोलिकदृष्ट्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यापासून अरबी समुद्रापर्यंत विस्तारलेल्या राजापूर तालुक्याचे विभाजन होऊन साठ-सत्तर गावांचा समावेश असलेल्या पूर्व भागासाठी स्वतंत्र तालुका निर्मिती व्हावी, अशी मागणी केली जात आहे. त्यासाठी गेल्या दोन दशकांपासून सातत्याने शासनदरबारी प्रयत्नही सुरू आहेत. या स्वतंत्र तालुक्याचे नामकरण आणि प्रशासकीय कार्यालय रायपाटण की, पाचल यावरूनही चांगलीच चर्चा रंगत असताना त्याबाबत प्रशासनाकडून आता थेट ग्रामस्थांची मते जाणून घेतली जाणार आहेत. स्वतंत्र तालुका निर्मितीसंबंधित लोकांची मते जाणून घेण्यासाठी सोमवारी (ता. २७) प्रांताधिकारी डॉ. जॅसमिन यांच्या उपस्थितीमध्ये पाचल आणि रायपाटण ग्रामपंचायतीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये चर्चा होऊन अपर तहसील कार्यालयासाठी पाचल की, रायपाटण यापैकी एका गावाची निवड होणार आहे.

विखुरलेल्या तालुक्यामुळे वेळेचा अपव्यय – तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण राजापूर शहर असल्याने शहरात प्रमुख शासकीय कार्यालये, राजकीय पक्षांची कार्यालये आणि सुविधा उपलब्ध आहेत. त्या मिळवण्यासाठी पूर्व भागातील लोकांना साठ ते सत्तर किमीचे अंतर कापून शहरात यावे लागते. शहरात आल्यानंतर शासकीय वा खासगी काम होईल, याची शाश्वती नाही. त्यामुळे पैसा आणि वेळेचा अपव्यय होतो. राजापूर शहर आणि समुद्रकिनाऱ्यावरील जैतापूर परिसर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला राजापूर शहर आणि पाचल-रायपाटण परिसर यामधील अंतर, ते कापण्यासाठी उपलब्ध असलेल्या वाहतुकीच्या सुविधा पाहता पाचल-रायपाटण परिसरातील लोकांना राजापूरची महागडी ठरते.

RELATED ARTICLES

Most Popular