25.1 C
Ratnagiri
Wednesday, February 12, 2025

बेकायदा मासेमारी; चार नौंकाना दंड – मत्स्यविभाग

राज्याच्या सागरी जलदी क्षेत्रात घुसखोरी किंवा बेकायदा...

‘जलजीवन’ची खोदाई पाडली बंद – कोळकेवाडी ग्रामस्थ

तालुक्यातील कोळकेवाडी येथे जलजीवन मिशन योजनेतील खोदाईच्या...

ऑपरेशन शिवधनुष्य! उपमुख्यमंत्री शिदेच्या उपस्थितीत शनिवारी पुन्हा उबाठाला रिंवडार पडणार

राज्यातील 'ऑपरेशन शिवधनुष्य'चा आरंभ जानेवारीत रत्नागिरी मतदारसंघात...
HomeRatnagiriस्मार्ट मीटर बसविणे तत्काळ थांबवा अन्यथा आंदोलन करण्याचा ठाकरे गटाचा इशारा

स्मार्ट मीटर बसविणे तत्काळ थांबवा अन्यथा आंदोलन करण्याचा ठाकरे गटाचा इशारा

ग्रामीण भागातील जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे.

महावितरणकडून बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरची प्रक्रिया तात्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लांजा तालुका शिवसेनेच्यावतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन गुरुवारी ६ फेब्रुवारी रोजी लांजा येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. दरम्यान, स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी जनसुनावणी घेवून लोकांचे म्हणणे ऐकून घेण्यात यावे व त्यानंतरच स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया हाती घेण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे युवा कार्यकर्ते अभिजित राजेशिर्के यांनी यावेळी बोलताना केली. महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांना सादर करण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, सध्या महावितरण विभागाकडून संपूर्ण तालुक्यामध्ये स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. या गोष्टीला आमच्या पक्ष संघटनेचा ठाम विरोध आहे.

सध्या बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरमुळे वेळोवेळी रिचार्ज करणे, त्याची देखभाल दुरुस्ती करणे ही गोष्ट ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाला तसेच शेतकरी वर्गाला शक्य नाही. अनेक गावांमध्ये आजही इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसल्याने स्मार्ट मीटर रिचार्ज करणे शक्य होणार नाही. त्यामुळे स्मार्ट मीटर बसविण्याबाबत ग्रामीण भागातील जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. जनतेचा स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध असताना देखील जर अशा पद्धतीने स्मार्ट मीटर बसविण्यासाठी महावितरणकडून जोर जबरदस्ती केली जात असेल तर आमचा या गोष्टीला ठाम विरोध राहील. तसेच संपूर्ण तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने स्मार्ट मीटर बसविण्यासाठी आपला जो प्रयत्न आहे त्या मनमानी कारभाराचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे लांजा तालुका या पक्षाच्यावतीने जाहीर निषेध करण्यात येत असून स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी जनसुनावणी घेण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

दरम्यान, स्मार्ट मिटर बसवण्याबाबत महावितरणने जोर जबरदस्ती केल्यास किंवा ती कृती न थांबविल्यास या विरोधात तीव्र जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे यांनी यावेळी बोलताना दिला आहे. हे निवेदन सादर करताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख दत्ता कदम, लांजा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदीप सावंत, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्टे, अभिजीत राजेशिर्के, उपशहर प्रमुख मोहन तोडकरी, विभागप्रमुख विश्वास मांडवकर, अंकुश गुरव, विजय जाधव, युवराज हांदे, माजी पं. स. सदस्या युगंधरा हांदे, पप्पू मुळ्ये, दिलीप चौगुले, रवींद्र राणे, सुभाष तावडे, राजेंद्र घडशी, प्रसाद कांबळे, सुरेश गवळी, शाखाप्रमुख महेश राऊत, विजय बंडबे, शाखा प्रमुख खानविलकर, धर्मेंद्र पालये, महादेव पवार व दीपक कटम आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular