27.5 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeSindhudurgसिंधुदुर्गच्या समुद्रात आढळले तेलसाठ्याचे मोठे घबाड

सिंधुदुर्गच्या समुद्रात आढळले तेलसाठ्याचे मोठे घबाड

सिंधुदुर्गात तेलसाठा सापडल्याने रोजगाराचे नवे साधन निर्माण होणार आहे.

सिंधुदुर्गच्या अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात खनिज तेलाचे मोठे घबाड आढळून आले आहे. १९७४ मध्ये बॉम्बे हायमध्ये तेलसाठा समोर आला होता. त्यानंतर पहिल्यांदाच तब्बल १८ हजार चौरस किमी क्षेत्रफळ पेक्षा जास्त साठा आढळला आहे. सिंधुदुर्ग ते डहाणूजवळीलच्या समुद्रात हे साठे आहेत. सिंधुदुर्गात १३ हजार १३१ चौ. मीटर क्षेत्रावर हा साठा आहे. १९७४ साली अरबी समुद्रात बॉम्बे हाय गॅसनंतर पुढे २०१७मध्ये ‘अमृत’ व ‘मुंगा’ या दोन तेल विहिरींवर काम सुरू झाले. आता त्यापेक्षा सिंधुदुर्ग व डहाणू परीसरात ४ पट मोठे तेलाचे साठे आढळून आले आहेत. या ठिकाणी केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार असून या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार मिळू शकतो. त्याच्या उत्खनासाठी निविदा प्रक्रिया सुरु झाली आहे. सिंधुदुर्ग समुद्रात १३ हजार १३१ चौ. की मीटर आणि डहाणूच्या समुदात ५८३८ चौ. की. मीटर क्षेत्रफळावर असे एकूण संभाव्य खनिज साठे आढळून आले आहेत. महाराष्ट्राशी निगडित दोन्ही साठे उथळ समुद्रातील असून, त्यांचे अंतर १३१.७२ चौरस किमी क्षेत्रफळावर किनाऱ्यापासून ८६ सागरी मैलापर्यंत असेल.

भारताचा सार्वभौम अधिकार असलेल्या किनाऱ्यापासून २०० सागरी मैल अंतरापर्यंतच्या भागात खनिज तेल व वायू उत्खननासाठी केंद्र सरकारकडून निविदेअंती खुला परवाना दिला जातो. त्याला ओपन अँकरेज लायसन्सिंग पॉलिसी (ओएएलपी) संबोधले जाते. याच ‘ओएएलपी’ची दहावी फेरी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने घोषित केली आहे. त्यामध्येच डहाणू व तळ कोकणातील सिंधुदुर्गतील साठ्यांचा समावेश आहे. खनिज तेल हे भूगर्भात असणाऱ्या पंकाश्म, शेल, वाळुकाश्म आणि चुन खडकात सापडते. भारतात खनिज तेल किंवा कच्च्या तेलाचे साठे प्रामुख्याने आसाम आणि गुजरात या राज्यांत आहेत. मुंबईजवळील उथळ समुद्राच्या तळाखाली सापडलेले अतिशय मोठे खनिज तेल क्षेत्र म्हणजे बॉम्बे हाय हे आहे. आता सिंधुदुर्गात तेलसाठा सापडल्याने रोजगाराचे नवे साधन निर्माण होणार आहे. लवकरच हे काम सुरू होईल, असे अपेक्षित आहे, असे म्हटले जाते.

RELATED ARTICLES

Most Popular