27.5 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeDapoliदापोलीत वणवा! २०० एकरातील आंबा, काजूच्या बागायती खाक

दापोलीत वणवा! २०० एकरातील आंबा, काजूच्या बागायती खाक

हातातोंडाशी आलेले पिक घेण्याआधीच लागलेल्या वणव्याने शेतकऱ्यांचा घात केला.

दापोली तालुक्यातील कांगवई पेडणेकर वाडीनजिक भर दुपारी भडकलेल्या वणव्यात सुमारे २०० एकर जमिनीतील आंबा, काजूची लागती झाडे जळून खाक झाली. त्यामुळे यावर्षीच्या हंगामात हाता तोंडाशी आलेले काजू बी चे पिक हे शेतकऱ्यांच्या हातून निसटले आहे त्यामुळे बाधीत शेतकरी हवालदिल झाले आहेत. दापोली तालुक्यातील कांगवई पेडणेकरवाडी जवळच भर दुपारी लागलेल्या वणव्याची आग भडकूनं त्यात कांगवईतील शेतकरी वर्गाचे मोठेच आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच बदलत्या हवामानातील बदलत्या वातावरणाने आंबा काजू पिकावर संक्रांत आली होती, त्यात रोग प्रतिकार शक्तीच्या महागड्या किंमतीच्या औषधांच्या आर्थिक दृष्ट्या न परवडणाऱ्या फवारण्या करून वन्य प्राण्यांच्या नुकसानीला राखणी ठेवून मेहनतीच्या जोरावर तसेच आर्थिक भार उचलत येथील शेतकऱ्यांनी काजूचे पिक बऱ्यापैकी वाचवले होते. हातातोंडाशी आलेले पिक घेण्याआधीच लागलेल्या वणव्याने शेतकऱ्यांचा घात केला. त्यामुळे कांगवई येथील बाधीत शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत.

कांगवई पेडणेकर वाडी येथील रहिवासी आणि ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तसेच सामाजिक कार्यकर्ते एक प्रगतशील शेतकरी अनिल पेडणेकर यांनी माहिती देताना सांगितले की भर दिवसा दुपारी रणरणत्या उन्हात आगीने अचानकपणे रौद्ररूप धारण केले त्यामुळे आधीच ऊन्हाचे चटके त्यात वणव्याच्या आगीची झळ यांने विझवणे मुश्कील झाले आणि सर्वांच्या डोळ्यादेखत अगदी मुलांप्रमाणे वाढवलेली जोपासलेली आंबा काजूची झाडे आगीत होरपळताना पाहवत नव्हते. मागील वेळचेच्याच विम्याची रक्कम अद्याप मिळालेली नसल्याने यावेळी शेतकरी विमा काढण्यास पुढे आले नाही. त्यामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करून शासनाने विशेष बाब म्हणून भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

कांगवई येथील सुरेश अंबाजी गायकवाड यांचे सुमारे ५०० काजू, ५० हापूस आंबे, भास्कर पांडुरंग पवार यांचे १५० काजू, प्रशांत राम चंद्र जाधव ५० काजू, ५० आंबे, चंद्रभागा शांताराम जाधव यांचे ७० काजू, प्रविण कृष्णा बाईत ५० काजू, आत्माराम पांडुरंग पवार ६० काजू, यशवंत रुके ५० काजू, रविराज काशिनाथ पवार १०० काजू, राजेश पांडुरंग पेडणेकर यांचे १०० काजू, विष्णू तानाजी बर्जे ८० काजू, भिकू लक्ष्मण पेडणेकर ९० काजू, विजय विठ्ठल शिगवण १५० काजू, अनिल दौलत पेडणेकर १०० काजू, सिताराम धोंडू बर्जे ५० काजू, सुनील बाळाराम पेडणेकर १५० काजू, तुकाराम रामजी पेडणेकर १५० हापूस, सुर्यकांत गणपत रहाटे २५ हापूस, अर्जुन सहदेव पवार आणि बबन सहदेव पवार यांचे १०० काजू, विजय लक्ष्मण अबगुल १५० काजू, वेणू लक्ष्मण वायकर २०० काजू, रामदास भागोजी बांद्रे १०० काजू, शंकर गोविंद मोकल ८० काजू, शंकर गोविंद आंबडस्कर १५० काजू, श्रीपत नारायण बर्जे १२५ काजू आदींसह आणखीन कितीतरी जनांची आंबा काजूची झाडे वणव्याच्या आगीत होरपळली आहेत त्यामुळे त्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular