25.3 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriरत्नागिरी - सिंधुदुर्गसह तीन राज्यात चोऱ्या, लुटमार करणाऱ्या टोळीच्या म्होरक्यासह सहकाऱ्याला पकडले

रत्नागिरी – सिंधुदुर्गसह तीन राज्यात चोऱ्या, लुटमार करणाऱ्या टोळीच्या म्होरक्यासह सहकाऱ्याला पकडले

टोळीतील आणखी काही फरारी साथीदारांची नावे निष्पन्न झाली आहेत.

महाराष्ट्र, कर्नाटकसह गोव्यात तसेच रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरफोडी, वाहन चोरी, लुटमारीच्या ठोकल्या आहेत. उत्तम राजाराम बारड (वय ३१, – रा. धामोड, ता. राधानगरी), अजिंक्य सयाजी केसरकर (३२, मत्तीवडे, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) अशी त्यांची पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. संशयिताच्या चौकशीतून दहा गुन्हे उघडकीला आले आहेत. ९ लाख ३१ हजार रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. सराईत टोळीने सीमावर्ती भागात अलिकडच्या काळात धुमाकूळ घातल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित उत्तम बारड हा टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्यावर कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील बेळगाव, धारवाड जिल्ह्यात तसेच गोव्यात ६२ गुन्हे दाखल आहेत. पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संजय कुंभार, विजय इंगळे, रोहित म दने, सागर माने, कृष्णात पिंगळे यांच्या पोलीस पथकाने कारवाई केल्याचे सांगण्यात आले.

या टोळीने अनेक ठिकाणी धुम ाकूळ घातला असून साथीदाराच्या मदतीने अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. टोळीतील आणखी काही फरारी साथीदारांची नावे निष्पन्न झाली आहेत. सराईतांना अटक केल्यानंतर गुन्हेगारी कारनाम्यांची व्याप्ती चव्हाट्यावर येईल, असे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी बोलताना सांगितले. प्राथमिक चौकशीत मूरगूड येथील दोन, आजरा, कुरूंदवाड, जयसिंगपूर येथील दोन, हुपरी, शहापूर, गोकुळ शिरगाव, सांगली जिल्ह्यातील सांगली व मिरज शहरातील १० गुन्ह्यांची संशयितांनी कबुली दिली आहे. १५ तोळ्याचे सोन्याचे, १७ तोळे चांदीचे दागिने, दोन दुचाकी व इतर साहित्यही हस्तगत करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular