26.9 C
Ratnagiri
Monday, July 7, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeRatnagiriजिवंत नसलेल्या महिलेच्या उपचारासाठी पैसे घेत तब्बल ५३ लाखांचा घातला गंडा

जिवंत नसलेल्या महिलेच्या उपचारासाठी पैसे घेत तब्बल ५३ लाखांचा घातला गंडा

रत्नागिरीतील एकाला ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

जिवंत नसलेल्या महिलेच्या उपचारांसाठी तब्बल ५३ लाख १३ हजार ५०० रुपयांची मागणी करत रत्नागिरीतील एकाला ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोघांवर रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची ही घटना ५ मे २०२२ रोजी दुपारी २:३१ ते २९ डिसेंबर २०२४ या कालावधीत मिरकरवाडा येथे घडली आहे, असे पोलीसांकडून समजते. पोलीसांनी पत्रकारांना दिलेल्या अधिक माहितीनुसार, या फसवणुकीप्रकरणी अलताफ हशमत साखरकर (३६, मूळ रा. रहबहर मोहल्ला साखरतर, सध्या रा. धनजी नाका, रत्नागिरी) यांनी सोमवारी फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीनुसार, संशयित आरोपी म्हणून अब्दुलसमद अलीमिया जयगडकर (रा. कोहिनूर प्लाझा, मांडवी रोड, रत्नागिरी) आणि प्रमिला हिंदूराव माटेकर ऊर्फ आयु पाटील (रा. सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर, रत्नागिरी) यांच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८ (२), ३५१ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ५ मे २०२२ ते २९ डिसेंबर २०२४ या कालावधीत रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथे घडला. अब्दुलसमद जयगडकर आणि प्रमिला माटेकर यांनी अलताफ साखरकर यांना सना शेख नावाची व्यक्ती जिवंतच नसताना तिच्या उपचारांसाठी पैशांची गरज असल्याचे खोटे सांगितले, असे फिर्यादीचे म्हणपणे आहे.

त्यानंतर दोघांनी साखरकर यांच्याकडून वेळोवेळी एकूण ५३ लाख १३ हजार ५०० रुपये ऑनलाइन पद्धतीने पाठवण्यास भाग पाडले. ‘दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अलताफ साखरकर यांनी संशयित आरोपी प्रमिला माटेकर या महिलेकडे आपले पैसे परत मागितले. मात्र, पैसे परत न मिळाल्याने त्यांनी फिर्याद दाखल केली.

महिलेची धमकी – साखरकर यांनी संशयित आरोपी प्रमिला माटेकर हिच्याकडे पैशांची म ागणी करताच तिने माझ्या राजकारणात खूप ओळखी आहेत. तसेच लोक माझ्या घरी येऊन पैशांची मागणी करतात, गुन्हा दाखल करेन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular