26.5 C
Ratnagiri
Thursday, July 31, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeSindhudurgमालवणमध्ये दोन एलईडी नौकांवर कारवाई…

मालवणमध्ये दोन एलईडी नौकांवर कारवाई…

सात लाख रुपयांचे लाईट, जनरेटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातीलत मालवण (जि. सिंधुदुर्ग) किल्ल्यासमोर अंदाजे आठ सागरी मैल समुद्रात अनधिकृतरित्या एलईडी लाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या रत्नागिरीतील दोन नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने करवाई केली आहे. या नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आल्या आहेत. नौकेवर असणारे लाईट व जनरेटर आदी उपकरणे जप्त करून सिंधुदुर्ग येथील सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयात ठेवण्यात आली आहेत. अनधिकृरित्या एलईडी लाईटद्वारे मासेमारी करणाऱ्यांवर कोकणात मत्स्य विभागाकडून कारवाई केली जाते. असे प्रकार रोखण्यासाठी मत्स्य विभागाकडून गस्तही घालण्यात येते. दरम्यान, मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग) किल्ल्यासमोरील सागरी समुद्रात अनधिकृतरित्या एलईडी लाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या रत्नागिरीतील दोन नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने कारवाई केली. या दोन्ही नौकांवर नौका तांडेलसह एकूण ६५ खलाशी आहेत. अंदाजे सात लाख रुपयांचे लाईट, जनरेटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे.

नौकांना ५ ते ६ लाख दंड होण्याची शक्यता आहे. बुधवारी (ता. १६) रात्री मालवण समोर मत्स्य व्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी रवींद्र ग. मालवणकर, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी नियमित गस्त घालत होते. या वेळी रत्नागिरी येथील परवाना असलेल्या नौका हाजी जावेद, मातिन-एच-इस्माईल या नौकांद्वारे मालवण किल्ल्यासमोर अंदाजे ८ ते ९ सागरी मैलामध्ये अनधिकृतरित्या एलईडी लाईटद्वारे मासेमारी करत असताना पकडले. या नौकेबाबत सुनावणी सिंधुदुर्ग येथील सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांच्यासमोर होणार आहे.

सहाय्यक आयुक्तांसमोर सुनावणी – कारवाई करण्यात आलेल्या दोनही नौकातील सुमारे सात लाख रुपयांचे लाईट, जनरेटरसह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या नौकांबाबतची सुनावणी सिंधुदुर्ग येथील सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांच्यासमोर होणार आहे. त्या नौकांवर पाच ते सहा लाखांचा दंड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular