28.6 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiri'वंदे भारत, तेजस'च्या आरक्षणात अडचणी - कोकण रेल्वे

‘वंदे भारत, तेजस’च्या आरक्षणात अडचणी – कोकण रेल्वे

एक्स्प्रेसचे १५ जूननंतरचे तिकीट आरक्षण मिळेनासे झाले आहे.

कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसल्याने जून महिन्यातील तिकिटे काढण्यास अडथळा येत आहे. विशेषतः सुपरफास्ट वंदे भारतसह तेजस एक्स्प्रेस व एलटीटी-मडगाव एक्स्प्रेसचे १५ जूननंतरचे तिकीट आरक्षण मिळेनासे झाले आहे. कोकण मार्गावरील कोलाडपासून ठोकूर या ७४० किमी अंतरापर्यंत पूर्व पावसाळी कामे हाती घेतली आहेत. कोकण रेल्वे प्रशासन १० जूनपासून पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी करते. यंदा ती तारीख पुढे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जून महिन्यातील गाड्यांचे आरक्षण खुले झाले आहे. असंख्य आयआरसीटीसी प्रवाशांनी संकेतस्थळावरून सुपरफास्ट सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेससह तेजस एक्स्प्रेस व एलटीटी-मडगाव एक्स्प्रेसची तिकिटे काढण्याचा प्रयत्न केला असता तिकिटे मिळेनाशी झाली आहेत.

त्यामुळे या तीनही गाड्यांमधून पावसाळ्यातील प्रवास होईल की नाही, याबाबत प्रवाशांकडून सांशकता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कोकण रेल्वेगाड्यांचे पावसाळी वेळापत्रक अद्ययावत केल्यानंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाळी वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. सर्व रेल्वे गाड्यांच्या वेळा निश्चित झाल्यानंतर प्रवाशांना तिकीट आरक्षण करता येईल, असे कोकण रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular