26.4 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeChiplunचिपळूणवर आता राहणार ११८ सीसीटीव्हीची नजर

चिपळूणवर आता राहणार ११८ सीसीटीव्हीची नजर

घरफोड्यांसह चोरीच्या वाढलेल्या प्रकाराना आळा बसावा आणि चोरट्यांचा शोध लागावा.

शहर व परिसरात घरफोड्यांसह चोरीच्या वाढलेल्या प्रकाराना आळा बसावा आणि चोरट्यांचा शोध लागावा, यासाठी नगरपालिकेने यापूर्वी ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते; मात्र ही यंत्रणा अपुरी पडत असल्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनाच्या सूचनेनुसार, येथील पोलिस यंत्रणेमार्फत शहरातील विविध भागात आणखी ८६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. याबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे. आता शहरावर ११८ सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. चिपळूण शहर झपाट्याने विकसित होत आहे. मोठमोठ्या इमारती, बंगले, अपार्टमेंटचे जाळे विणले जात आहे. लोकवस्ती वाढली आहे शिवाय तालुक्याची बाजारपेठही येथे आहे. गेल्या काही वर्षांत शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही भागांत सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरी करून हे चोरटे कुठे गेले, याचा सुगावा पोलिसांनाही लागला नाही.

यापूर्वी पोलिसांनी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना चिपळूण पालिकेला दिल्या होत्या. नगरपालिकेने काही चौकात ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. या कॅमेऱ्याचे नियंत्रण चिपळूण पोलिसांकडे होते. मात्र, ही यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे संपूर्ण शहर टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कक्षेत आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. चिपळूण शहरातील मुख्य भागांसह विविध ठिकाणी, अंतर्गत रस्त्यांवर व रहदारीच्या ठिकाणीही आणखी ८० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची कार्यवाहीदेखील सुरू झाली आहे.

ओळखपत्र बंधनकारक – शहरात पोलिसांचे दोन पथक रात्रीची गस्त घालत आहेत. याशिवाय शहरात रात्रीच्यावेळी काम करणाऱ्या सुरक्षारक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनादेखील ओळखपत्र सोबत ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular