26.5 C
Ratnagiri
Monday, June 23, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeRatnagiriरत्नागिरीत भाट्येसह पांढऱ्या समुद्रावर मुळ्यांचा खजिना

रत्नागिरीत भाट्येसह पांढऱ्या समुद्रावर मुळ्यांचा खजिना

भाट्ये किनाऱ्यावर मुळे गोळा करण्यासाठी परिसरातील तसेच दूरदूरचे नागरिक धावले.

एक जून रोजी समुद्रातील मासेमारी बंद झाली. त्यामुळे मत्स्यप्रेमी नाराज झाले असले, तरी दोन दिवस मुळे सापडल्याने त्यांनी समाधान मानले. भाट्ये किनाऱ्यावर मुळे गोळा करण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. यामुळे पोलिसांनी सायरन वाजवून समुद्रात पुढे जाण्यापासून रोखले तसेच अनेकांना परत येण्यास पोलिसांनी सूचना दिल्या. त्यानंतर बरेच लोक माघारी परतले. काही छोट्या नौकासुद्धा समुद्रात उभ्या होत्या. त्यातील महिला, पुरुष मुळे गोळा करण्यात व्यस्त होते. दोन दिवसांपूर्वी एका मच्छीमाराच्या पायाला हे घबाड लागल्याने ही बातमी समोर आली. त्यानंतर अवघ्या काही तासांतच भाट्ये किनाऱ्यावर मुळे गोळा करण्यासाठी परिसरातील तसेच दूरदूरचे नागरिक धावले.

बघ्यांची गर्दी इतकी वाढली की, भाट्ये पुलावरही वाहतूककोंडी झाली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. कोकणात या शिपल्यांना मुळे किंवा शिंपले म्हणतात. प्रामुख्याने तसरे आणि धामणे अशा दोन जाती मोठ्या प्रमाणावर आढळतात. कोकणातील मत्स्यप्रेमी खवय्ये तसरे मुळे मोठ्या आवडीने खातात आणि त्यांना मोठी पसंती असते; मात्र सध्या भाट्ये किनाऱ्यावर सापडत असलेली मुळ्यांची जात थोडी वेगळी आहे. याला चायना मुळा असे स्थानिक नाव देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular