26.4 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeChiplunचिपळूणमध्ये ना तुंबले नाले, ना साचले शहरात पाणी

चिपळूणमध्ये ना तुंबले नाले, ना साचले शहरात पाणी

सरासरी शंभर मिमी पाऊस होऊनही पहिल्या पावसाळ्यात शहरात कोठेही पाणी साचले नाही.

यावर्षी मे महिन्यात झालेला पाऊस मुंबई, पुणेसारखाच चिपळूणमध्ये झाला; मात्र पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात नागरिकांनी सुचवलेल्या सूचनांवर प्रशासनाने काम केले. त्यामुळे सरासरी शंभर मिमी पाऊस होऊनही पहिल्या पावसाळ्यात शहरात कोठेही पाणी साचले नाही. त्यामुळे पालिकेची नालेसफाईची मोहीम फत्ते झाली. डोंगराळ भागातून शहरात येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा तत्काळ निचरा होत नाही. त्यामुळेही शहरात पूरपरिस्थिती निर्माण होते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून दरवर्षी नालेसफाईसह इतर उपाययोजना केल्या जातात; मात्र पहिल्याच पावसात शहरात पाणी साचल्यानंतर पालिकेच्या उपाययोजना कुचकामी होत्या, असा आरोप नागरिकांकडून केला जात होता. यापूर्वी नालेसफाई केल्यानंतर पहिल्याच पावसाळ्यात नाल्यात माती येऊन नाले पुन्हा मातीने भरलेले असायचे.

त्या वेळी स्वच्छ केलेल्या नाल्यात डोंगरावरून माती आल्याचे स्पष्टीकरण पालिकेकडून दिले जायचे. यावेळी प्रशासनाने एकतर्फी उपाययोजना न करता प्रांताधिकारी आकाश लिगाडे, मुख्याधिकारी विशाल भोसले आणि तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी २ एप्रिलला इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात नागरिकांची बैठक घेतली. नागरिकांकडून सूचना मागवल्या, त्यानंतर मॉन्सूनपूर्व नियोजन आणि तयारीला सुरुवात झाली.

मुख्याधिकारी विशाल भोसले, आरोग्य निरीक्षक महेश जाधव, सुजित जाधव, वैभव निवाते नागरिकांनी सुचवलेल्या जागेवर गेले. नागरिकांना बोलावून तेथील परिस्थितीची पाहणी केली. ज्या ठिकाणी मनुष्यबळाचा वापर करता येईल अशा ठिकाणी पालिकेचे सफाई कामगार लावून नाल्यांची स्वच्छता करण्यात आली. चिपळूण शहरात १० मेपासून पावसाचे आगमन झाले. २१ मेनंतर पावसाचा जोर वाढला होता. दिवसाला सरासरी १०० मिमी पाऊस होत होता. पूर्वी दहा मिनिटांच्या पावसाने शहरात पाणी साचायचे. या वेळी अर्धा ते पाऊण तास सलग पाऊस झाला तरी शहरात अपवाद वगळता कुठेही पाणी साचले नाही. सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular