26.4 C
Ratnagiri
Monday, June 23, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeRatnagiriलांज्यातील तरुण लग्नाच्या एक दिवस आधी बेपत्ता दुसऱ्या दिवशी अणूस्कुरा घाटात सापडला मृतदेह

लांज्यातील तरुण लग्नाच्या एक दिवस आधी बेपत्ता दुसऱ्या दिवशी अणूस्कुरा घाटात सापडला मृतदेह

घातपात की आत्महत्या याबाबत उलटसुलट चर्चा होत असून तपासाचे आव्हान ठाकले आहे.

सोमवारी मध्यरात्री कौस्तुभ हा अणूस्कुरा मार्गावरून पुढे जात असल्याचे राजापूर पोलीसांच्या अणूस्कुरा घाटात पोलीस चौकी समोर असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळून आले आहे. तर त्याच्या नापत्ता झालेल्या तक्रारीनंतर लांजा पोलीसांनी त्याचे मोबाईल लोकेशन तपासले असता ते घाट परिसरात पांगरी असे दिसून आल्याचे पोलीसांनी सांगितले. त्यामुळे सोमवारी मध्यरात्री अथवा पहाटे हा अपघात झाला असावा असा पोलीसांचा कयास आहे.

लग्न होणार होते – लांजा शहरातील कुरूपवाडी येथे राहणारा कौस्तुभकुरूप याचा केदारलिंग टूर्स अँड ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. तो बेपत्ता झाल्याची फिर्याद त्याची पत्नी प्राजक्ता श्रीकांत सुर्वे (२६ वर्षे, रा. पुष्पेंद्र सिटी रेसिडेन्सी महालक्ष्मी मंदिर, खेडशी, रत्नागिरी, सध्या रा. लांजा) हिने लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे. प्राजक्ता सुर्वे हिने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचे आणि कौस्तुभ कुरुप यांचे गेल्या सात वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र त्यांच्या लग्नाला घरातून आई वडिलांचा विरोध होता. मात्र तरी देखील कौस्तुभ याने प्राजक्ता हिच्याशी दि. ५ मे २०२५ रोजी रत्नागिरी येथे रजिस्टर पद्धतीने विवाह केला होता. त्यानंतर मंगळवार दि. ३ जूनं २०२५ रोजी त्यांनी विधिपरंपरेने साखरपुडा करून बुधवार दि. ४ जून रोजी ते विवाह करणार होते. मात्र कौस्तुभ हा मंगळवारी ३ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमाराच्या घरातून बेपत्ता झाला होता.

पत्नीची पोलिसांत तक्रार – घरातून बाहेर पडताना पत्नी प्राजक्ता किंवा आपल्या कुटुंबातील कोणालाही काहीही न सांगता तो आपल्या ताब्यातील अर्टिगा कार (क्र. एमएच ०८ एएक्स ६१५५) घेवून घरातून बाहेर पडला होता. मात्र त्यानंतर त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. आजूबाजूचा परिसर, नातेवाईक व मित्रमंडळींकडे चौकशी करून देखील त्याचा कुठेही पत्ता न लागल्याने अखेर पत्नी प्राजक्ता सुर्वे तिने कौस्तुभ हा बेपत्ता झाल्याची फिर्याद मंगळवार दि. ३ जून रोजी सायंकाळी लांजा पोलीस ठाण्यात दिली होती. तशी माहिती लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी दिली आहे. या तक्रारीनंतर पोलीसांनी कौस्तुभ याच्या पालकांशी संपर्क साधला होता. तर त्याचे मोबाईल टॉवर लोकेशन तपासले असता ते राजापूर तालुक्यात अणूस्कुरा घाट परिसरात पांगरी असे होते अशीही माहीती पोलीसांनी दिली आहे.

दरीत मृतदेह आढळला – दरम्यान बुधवारी सकाळी अणुस्कुरा घाटात व्यवसाय करणाऱ्या जय पटकारे या व्यावसायीकाला अणूस्कुरा घाटात एका गाडीचे इंजिन कोसळलेले दिसून आले. तर दरीत मृतदेह दिसुन आला. त्यांनी तात्काळ अणूस्कुरा चेकपोस्टवर डयुटीवर असलेल्या सचिन वीर यांच्याशी तसेच रायपाटण दुरक्षेत्रातील पोलीस अंमलदार कमलाकर तळेकर यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. यावेळी तात्काळ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असता अणूस्कुरा घाटात खोल दरीत एक कार कोसळलेली दिसून आली. या कारचे इंजिन घाटात खालील बाजूस रस्त्यावर पडलेले दिसून आले. तर कारचे अन्य भाग अन्यत्र विखुरलेले दिसून आले. तर दरीत एक मृतदेहही पोलीसांनी दिसून आला.

मृतदेह बेपत्ता तरुणाचा – या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादवही आपल्या सहाकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. तर अपघातात मृत्युमुखी पडलेला युवक हा लांजा येथील असल्याचे कळताच लांजा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे हे देखील आपल्या सहकाऱ्यांसह अणूस्कुरा घाटात दाखल झाले होते. पोलीस व स्थानिकांच्या मदतीने कौस्तुभ याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे, संजय घाडगे, कमलाकर तळेकर यांसह राजापूर, लांजा पोलीस कर्मचारी तसेच पांगरी सरपंच अमर जाधव, पोलीस पाटील सयाजी जाधव, दयानंद तेलंग, हर्षद तेलंग, विहांग खानविलकर, रवींद्र नारकर, पिंट्या बाकाळकर, प्रदीप लाड, अनिकेत ताम्हणकर आदींसह पाचल, लांजा परिसरातील अनेकांनी यावेळी पुढे येत सहकार्य केले.

अपघात की घातपात ? – बुधवारी पोलीस प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्यातुन घाटात दरीत असलेला कौस्तुभ याचा मृतदेह सायंकाळी ४ वाजता दरीतुन बाहेर काढण्यात आला. यानंतर रायपाटण ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली. कोल्हापूरकडून पाचल कडे येत असताना हा अपघात झाला असून नेमका अपघात किती वाजता झाला हे कळून आलेले नाही. दरम्यान नापत्ता असलेल्या कौस्तुभ याचा तो चालवत असलेल्या गाडीसह मृतदेह अणूस्कुरा घाटात आढळून आल्याने हा अपघात, घातपात की आत्महत्या याबाबत उलटसुलट चर्चा होत असून राजापूर व लांजा पोलीसापुढे या अपघाताच्या तपासाचे आव्हान ठाकले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular