26.7 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriबाळ मानेंवर उध्दव ठाकरेंनी सोपविली उपनेतेपदाची जबाबदारी

बाळ मानेंवर उध्दव ठाकरेंनी सोपविली उपनेतेपदाची जबाबदारी

भाजपात परतणार अशा चर्चाही सुरू होत्या.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रत्नागिरी जिल्ह्यात अनेक धक्के बसत असतानाच भाजपमधून ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटात प्रवेश करणारे रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांच्याकडे आता पक्षाने उपनेतेपद सुपूर्द केले आहे. जिल्ह्यात ठाकरे गटाची होत असलेली पडझड पाहता हे संघटनात्म क पद सांभाळणे बाळ मानेंसाठी आव्हान असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. दरम्यान बाळ माने यांची उबाठाच्या उपनेतेपदी निवड झाल्याने गेले काही दिवस त्यांच्या घरवापसीच्या ाने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. निवडणूक झाल्यापासून माने भाजपात परतणार अशा चर्चा सुरू आहेत. किम ान या नियुक्तीने या चर्चातरी थांबतील असे बोलले जाते.

नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ऐनवेळी बाळ माने यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. पक्षाने त्यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देखील दिली. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक नाराज झाले होते. या निवडणुकीत रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी पुन्हा एकदा बाळ मानेंचा पराभव केला. या पराभवानंतर बाळ माने तसे शिवसेनेच्या दैनंदिन कामकाजात सक्रिय असल्याचे दिसत नव्हते. भाजपात परतणार अशा चर्चाही सुरू होत्या. मात्र अचानक गुरूवारी बाळ माने यांची शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त हाती आले, ही संघटनात्मक जबाबदारी पार पाडणे बाळ मानेंसाठी आव्हान असणार आहे.

निवडणुकीतील पराभवानंतर केवळ रत्नागिरी-संगमेश्वर म तदारसंघाचा विचार केला तरीदेखील – ठाकरे गटाला अनेक धक्के बसले आहेत. तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रम खांसह अनेक विभागप्रमुख, शाखाप्रम ख यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत शिवसेनेमध्ये (शिंदे गट) प्रवेश केला. हे धक्के जिल्ह्यातही बंसत आहेत. दोन्ही जिल्हाप्रमुख शिंदेंसोबत गेल्याने उबाठाने दोन नवे जिल्हाप्रमुख नेमले आहेत. अंन्य पदाधिकारीही ठाकरेंऐवजी शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेत आहेत. या पार्श्वभूमीवर बाळ माने यांच्या खांद्यावर पक्ष संघटना वाढविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उपनेतेपदाची जबाबदारी सोपवत उध्दव ठाकरेंनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. उपनेतेपदाला न्याय देत पुन्हा एकंदा ठाकरेंचा गड मजबुतीने उभारण्याचे आव्हान माने यांच्यासमोर आहे.

RELATED ARTICLES

Most Popular