28 C
Ratnagiri
Friday, June 13, 2025

रत्नदुर्गाच्या बुरूज परिसरात अतिक्रमण…

रत्नागिरीतील प्रसिद्ध रत्नदुर्ग किल्ल्याचा टेहळणी बुरूज पेठकिल्ला...

शिक्षकांना प्रशिक्षणात अपमानास्पद वागणूक – संभाजी थोरात

राज्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणामध्ये प्रथमच...

कृषी विद्यापीठाचा ई-मेल हॅक करून फसवणूक

येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या...
HomeRatnagiriरत्नागिरीत सापडलेले ते मांस बोकडाचे...

रत्नागिरीत सापडलेले ते मांस बोकडाचे…

अवशेषही तपासणीसाठी कोल्हापूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

शहरातील एका अपार्टमेंटच्या वॉचमनच्या खोलीत जप्त केलेले मांस गोवंशाचे नसून बोकडाचे असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. मांसाचे अन्य अवशेषही तपासणीसाठी कोल्हापूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. यामुळे गोवंश हत्येवर पडदा पडला आहे. मंगळवार (ता.३) एका अपार्टमेंटमध्ये गोमांस सापडलेल्याच्या संशयावरून सकल हिंदू समाज आक्रमक झाला. पोलिसांनी मांस जप्त करत वॉचमन पती पत्नीसह तिघांवर गुन्हा दाखल केला होता. वॉचमनची चौकशी केल्यानंतर त्याने वस्तुस्थिती कथन केली. नासीर याने सिरोही जातीचा बोकड राजस्थान येथून आणला होता. हवामानातील बदलामुळे त्याची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्याला उद्यमनगर येथील पशुचिकित्सालय येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथून घरी आणण्यात आले.

परंतु मंगळवारी त्या बोकडाचा मृत्यू झाला. मृत्यू बोकडाची विल्हेवाट लावण्यासाठी मुल्ला याने घंटागाडीत देण्याचा प्रयत्न केला. परंतु मृतप्राणी घेत नसल्याचे पालिका कर्मचाऱ्यांनी सांगितले. अखेर वॉचमनने याच्यासह त्याच्या सहकाऱ्यांना मृत बोकड पुरण्यासाठी दिला. त्यासाठी एक टेम्पो आणण्यात आला. त्यानंतर मृत बोकड पुरण्याऐवजी तो कापला. हा घटनाक्रम ऐकून पोलिसांनी याची खातरजमा केली. रणजितने सांगितलेली माहिती पुर्णतः खरी निघाली.

RELATED ARTICLES

Most Popular