26.7 C
Ratnagiri
Thursday, July 31, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeKhedगांजा प्रकरणी आणखी एकाला अटक - महाड कनेक्शन

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजाचा पुरवठा केलेल्या व्यक्तींची नावे व मोबाईल नंबरही त्याच्या मोबाईलमध्ये सापडले आहेत.

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील पोलिस यंत्रणा असतानाच शुक्रवारी (ता. ६) पहाटेच्या सुमारास गांजा पुरवणाऱ्या कमलेश सदाशिव जंगम (वय २१, रा. नालासोपारा-पालघर) या तिसऱ्या संशयिताच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. येथील रेल्वे पुलाखाली पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली. संशयित इतरांना गांजाचा पुरवठा करत होता, अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. त्याचा मोबाईलही जप्त केला असून गांजा खरेदी-विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. दोन किलो गांजा वाहतूकप्रकरणी पोलिसांनी कमलेश उर्फ सुजल उर्फ रंजित विचारे (२०, रा. नालासोपारा, सध्या शिवतर-दत्तवाडी, खेड), रवींद्र प्रेमचंद खेरालिया (२५, उत्तर प्रदेश, सध्या रा. मीरा रोड, ठाणे) यांना गजाआड केले. या दोघांना अटकेतील कमलेश जंगम हा गांजाचा पुरवठा करत होता.

अन्य व्यक्तींनाही संशयिताने गांजाचा पुरवठा केल्याची माहिती उघड झाली आहे. महाड येथेही एका टपरी व्यावसायिकास त्याने गांजा पुरवल्याची कबुली पोलिसांना दिली. संशयिताचा मोबाईलही पोलिसांनी जप्त केला. नालासोपारा-पालघर संशयिताला शिताफीने येथे जेरबंद करणाऱ्या पथकात पोलिस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे, पोलिस हेडकॉन्स्टेबल वैभव ओहोळ, पोलिस कॉन्स्टेबल अजय कडू, राम नागुलवार यांचा समावेश होता. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

नावे, मोबाईल नंबरही पोलिसांच्या हाती – दरम्यान, जप्त केलेल्या मोबाईलमध्ये गांजाचे व्हिडिओ आढळले. गांजाचा पुरवठा केलेल्या व्यक्तींची नावे व मोबाईल नंबरही त्याच्या मोबाईलमध्ये सापडले आहेत. त्यामुळे गांजा खरेदी-विक्री प्रकरणात मोठे रॅकेट असल्याचा पोलिसांना दाट संशय असून, अटकेतील संशयिताची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याच्याकडून खरेदी करणारे व्यावसायिकही पोलिसांच्या रडारवर आहेत. गांजा खरेदीचे ओडिसा कनेक्शन समोर आले आहे. ज्या ज्या व्यक्तींना विक्री करण्यात आलेला गांजा हा ओडिसा येथूनच आणल्याची कबुली अटकेतील संशयिताने यापूर्वीच दिली. जंगमच्या अटकेने आणखी नवे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular