24.3 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriजिल्ह्याला मिळणार आयसीयू बालरुग्णवाहिका...

जिल्ह्याला मिळणार आयसीयू बालरुग्णवाहिका…

या रुग्णवाहिका प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहेत.

आपत्कालीन वैद्यकीय सेवेंतर्गत १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांना तातडीची मदत मिळते. आता या सेवेंतर्गत अत्याधुनिक १ हजार ७५६ रुग्णवाहिका राज्याला मिळणार आहेत. त्यापैकी रत्नागिरीला एक आयसीयू बालरुग्णवाहिका मिळणार आहे. या रुग्णवाहिका प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहेत. याची अंमलबजावणी येत्या काही दिवसांतच होणार आहे. राज्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातील रुग्णांना तत्काळ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी १०८ रुग्णवाहिका सेवा सुरू केली. आता या अत्याधुनिक रुग्णवाहिकांच्या माध्यमातून अद्ययावत आरोग्यसेवा प्रदान केली जाणार आहे. या रुग्णवाहिकेमध्ये डॉक्टर आणि निम्नवैद्यकीय कर्मचारीही असणार आहेत. हा नवीन १०८ रुग्णवाहिका कार्यक्रम राज्यभर राबवण्यात येणार आहे.

यात भागीदार संस्था १ हजार ७५६ अत्याधुनिक रुग्णवाहिका तैनात करणार आहे. आपत्कालीन प्रसंगी रुग्णांना तातडीची काळजी आणि उपचार या रुग्णवाहिकेमध्ये मिळेल. त्यात प्राणवायू सुविधा, अत्याधुनिक स्ट्रेचर आणि हृदयविकारासंदर्भातील उपकरणे असतील. या नवीन १०८ प्रकल्पाचा प्रारंभ राज्यात पाच टप्प्यांत होणार असून, त्याची अंमलबजावणी नोव्हेंबरपासून सुरू होईल. त्यासाठी सुमारे १ हजार ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या अत्याधुनिक रुग्णवाहिका या वेगवेगळ्या प्रकारच्या असणार आहेत. त्यात बेसिक लाइफ सपोर्ट, अॅडव्हान्स्ड लाइफ सपोर्ट, निओनटल केअर युनिट या प्रकारच्या रुग्णवाहिकांसोबत दुचाकी रुग्णवाहिका, बोट रुग्णवाहिकांचा समावेश असेल. सार्वजनिक-खासगी भागीदारीतून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. आरोग्य प्रशासनाने याला दुजोरा दिला.

नवीन अत्याधुनिक रुग्णवाहिका सुविधा हा :-  मोबाइल डाटा टर्मिनल – रुग्णाची माहिती रुग्णवाहिकेतून थेट रुग्णालयाला पाठवणारी यंत्रणा. वैद्यकीय टॅबलेट – अत्याधुनिक वैद्यकीय तपासणीसाठी संगणकीय उपकरण. आरएफआयडी – जीपीएस रुग्णवाहिकेचे नेमके ठिकाण दाखवणारी यंत्रणा. ट्रायएज सिस्टिम – रुग्णाच्या स्थितीनुसार उपचाराची तीव्रता दर्शवणारी यंत्रणा.

RELATED ARTICLES

Most Popular