26.5 C
Ratnagiri
Thursday, July 31, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeRatnagiri… अन् रत्नागिरीच्या रस्त्यावर उतरले यमराज !

… अन् रत्नागिरीच्या रस्त्यावर उतरले यमराज !

निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या चालकांना अपघाताची आठवणही करून देत होता.

शहरातील रस्त्यांची दुरवस्था तसेच महामार्गावर होणाऱ्या अपघाताला आळा घालण्यासाठी वाहतूक नियमांची जागरूकता करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि शहर वाहतूक पोलिसांतर्फे वाहतूक जागरूकता कार्यक्रम शहरातील जेलनाका रोड येथे झाला. वाहतूक जनजागृतीसाठी रत्नागिरीतील रस्त्यावर यमराज फिरताना पाहिल्यानंतर वाहनचालकही अचंबित झाले होते; मात्र हा जनजागृतीसाठीचा फंडा असल्याचे चालकांच्या लक्षात आल्यावर हायसे वाटले. बुधवारी सकाळी जेलनाका येथील चौकात जनजागृती करण्यात आली. रस्त्यावर चक्क यमदूत फिरताना दिसत होता. नियम पाळा; अन्यथा तुमच्या आयुष्याची दोरी माझ्या हातात आहे, असेच जणू सांगत होता. या कार्यक्रमात साकारण्यात आलेल्या यमदुताची भारदस्त शरीरयष्टी, खांद्यावर गदा आणि अंगावर काळा ड्रेस पाहून लहान मुलेही घाबरत होती.

निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या चालकांना अपघाताची आठवणही करून देत होता. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आयोजित ‘आपली सुरक्षा परिवाराची सुरक्षा’ या रस्तेसुरक्षा कार्यक्रमात दुचाकीस्वारांना हेल्मेटचे महत्त्व पटवून देण्यात येत होते. वाहतुकीचे नियम पटवून देण्यात येत होते. झेब्रा क्रॉसिंगचा वापर करा, हेल्मेट घाला, जीव वाचवा, वाहन चालवा सावधपणे, घरी जा सुरक्षितपणे, फूटपाथचा वापर करा, धावत्या वाहनांच्या मार्गापासून दूर राहा, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण, वेगमर्यादा पाळा, आयुष्य टिकवा, सीटबेल्टचा वापर करा, मद्यपान टाळा अशाप्रकारे वाहतुकीचे नियम दर्शवणारे पत्रक वाहनचालकांना देण्यात येत होते. या वेळी हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीस्वारांचा जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

RELATED ARTICLES

Most Popular