26.9 C
Ratnagiri
Thursday, July 3, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriलांज्यातील 'त्या' ३०० खोकेधारकांना नोटिसा

लांज्यातील ‘त्या’ ३०० खोकेधारकांना नोटिसा

छोटा-मोठा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे लांजा शहरामध्ये काम सुरू आहे. या कामांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून, रस्त्यावरील छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्या खोकेधारकांना अनधिकृत ठरवण्यात आले आहे. ३ जुलैपर्यंत व्यवसाय बंद न केल्यास अथवा खोके न हटविल्यास त्यांच्यावर पोलिसांच्या साह्याने दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशा नोटिसा नगरपंचायत व तहसील कार्यालयांनी दिल्या आहेत. शहरातील हे खोकेधारक अन्य कोणत्याही राज्य अथवा जिल्ह्यांतून आलेले नसून स्थानिक आहेत. त्याचबरोबर गेले अनेक वर्षे ते छोटा-मोठा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत. महामार्गाच्या कामामुळे त्यांचा व्यवसाय अस्थिर झाला आहे. या परिस्थितीत प्रशासनाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारल्यामुळे खोकेधारकांमध्ये तीव्र नाराजी आहे. शहरात ३०० खोकेधारक असून, उदरनिर्वाहासाठी वडापाव, चहा, कपडे विक्री, भाजीपाला असे व्यवसाय करीत आहेत.

त्यांना आता आपला व्यवसाय बंद करावा लागणार आहे. त्यांच्यावर बेकारीची वेळ येणार आहे. या नोटिशींमुळे भयभीत झालेल्या शहरातील व्यावसायिकांनी तालुकाप्रमुख सुरेश करंबळे यांची भेट घेऊन आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत सहकार्य करण्याची विनंती केली. शिवसेनेने शहरातील खोकेधारकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केला आहे. प्रशासनाने किंवा नगरपंचायतीने कारवाईची नोटीस देताना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र, अशी

कोणतीही भूमिका नगरपंचायतीने घेतलेली नाही. सध्या पावसाचे दिवस आहेत. अवघ्या एक ते दीड महिन्यानंतर गणपती सण येत आहे. अशावेळी त्या व्यावसायिकांनी काय करायचे, असा प्रश्न करंबळे यांनी उपस्थित केला. ज्येष्ठ शिवसैनिक नितीन शेट्ये म्हणाले, शहरातील महामार्गालगत अनेक अनधिकृत बांधकामे उभी आहेत, तसेच अनेक इमारतीही उभ्या राहत आहेत. मात्र, धनदांडग्यावर कारवाई करण्याची हिंमत प्रशासन करीत नाही. हातावर पोट असलेल्या सर्वसामान्यांवर कारवाई करीत आहे. सर्व खोकेधारकांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी आहे.

RELATED ARTICLES

Most Popular