27.3 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeKhedखेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, जगबुडीने धोका पातळी ओलांडली…

खेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, जगबुडीने धोका पातळी ओलांडली…

गेल्या २४ तासात तालुक्यात १७० मी. मी. पावसाची नोंद झाली आहे.

खेड तालुक्यात गेले ६ दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने शहरातील जगबुडी नदीने सलग ५ वेळा धोका पातळी ओलांडली असून तिचे पाणी खेड शहरात घुसण्याचा धोका कायम आहे. तसेच नारंगी नदीला देखील पूर आल्याने पुराचे पाणी किनाऱ्यावरील भात शेतीत घुसले आहे. दरम्यान खेडला पावसाने झोडपून काढले असून मंगळवारी मच्छिमार्केटमध्ये पाणी आले होते. मशीदीपर्यंत पाण्याने धाव घेतल्याने पुराचे पाणी केव्हाही खेड शहरात घुसू शकते, ही भीती मंगळवारी सर्वांना होती. खबरदारीचे सर्व उपाय करण्यात आले आहेत. जगबुडी आणि नारंगी नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे खेड शहराशी खाडीपट्टा विभागाचा संपर्क तुटला आहे. रात्रभर पडलेल्या पावसामुळे सुर्वे इंजीनारिंग जवळ पाणी आल्याने खेड, दापोली, मंडणगड या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाने छोटी वाहने कुंभारवाडी क्षेत्रफळमार्गे वळवून वाहतूक सुरळीत केली. तालुक्यात सह्याद्रीच्या खोऱ्यात दिवसरात्र संततधार पाऊस सुरु असल्याने सकाळी ११:३० वाजेपर्यंत जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी ७:४० मीटरवर होती. मात्र त्यानंतर पावसाचा जोर कमी जास्त होत असल्याने पाण्याची पातळी ७:२० मीटर झाली होती. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून खेड आगारातील ग्रामीण भागातील एकूण १५८ फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

पावसाचा धुमाकूळ – खेड बाजारपेठेतील व्यापारी गणेशोत्सवाच्या तयारीला लागलेले असतानाच सलग चार दिवस पावसाने धुमाकूळ घातल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत.

दरड कोसळली – खेड तालुक्यातील लोटे-चिरणी मार्गावर लोटे गावठाण येथे दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. सध्या पडणाऱ्या मुसळधार सळधार पावसाचा फटका या रस्त्याला बसल्याने मोठ्या प्रमाणात लोटे एमआयडीसी कामाला जाणाऱ्या कामगार वर्गाला बसला आहे. दरड पूर्णपणे रस्त्यावर पसरल्याने साधा दुचाकीस्वार तसेच पायी जाणाऱ्यांनाही मार्ग बंद झाल्याने मोठ्या प्रमाणात येथील ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे. परशुराम घाटात अपघात झाल्यास पर्यायी रस्ता म्हणून लोटे चिरणी आंबडस हा रस्ता बनविण्यात आला होता. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असून एमआयडीसीकडे जाणारे काम गारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच खेड मुंबईकडे जाणारा हा मार्ग असून दरड कोसळल्याने सकाळपासून वाहतूक अडकून पडली आहे.

२४ तासांत तब्बल १७० मिमी. पाऊस – गेल्या २४ तासात तालुक्यात १७० मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. सलग चार दिवस पावसाने शतक पार केले आहे. तालुक्यात शनिवारी १०९.५७ मी. मी… रविवारी १७८.७१ मी. मी.., सोमवारी १७० मी. मी., तर मंगळवारी १७२.१४ मी. मी.., पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात जून महिन्यापासून आजपर्यंत ३२४०:१४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. खेड महसुली विभागात पडलेला पाऊस खेड १५५ मी. मी, भरणे १६५ मी.. मी, शिर्शि १७५ मी. मी, आंबवली १८६ मी. मी, लवेल २२६ मी. मी, कुळवंडी १५८ मी. मी, धामणंद १४० मी. मी. पाउस पडला आहे तर एकूण १२०५ मी. मी. पावसाची नोंद ही एका दिवसात झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular