27.3 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeKhedगणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांना टोल माफ

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांना टोल माफ

'गणेशोत्सव २०२५ कोकण दर्शन' या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येतील.

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांना बाप्पा पावला असून सरकारने त्यांच्यासाठी टोलमाफीची सवलत जाहीर केली आहे. परतीच्या प्रवासासाठीदे खील ही टोलमाफी दिली जाणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना व एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे. यासाठी ‘गणेशोत्सव २०२५ कोकण दर्शन’ या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येतील. या पासवर वाहन क्रमांक व वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल.

हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस व वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील.  परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्राह्य धरले जाणार आहेत. शासनाच्या आदेशानुसार ग्रामीण व शहरी पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने पास वाटपाचे समन्वय साधून प्रवाशांना वेळेत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच या संदर्भात जाहिरात व सूचना प्रसिद्ध करून जनतेला माहिती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्य शासनाच्या या निर्णयाने कोकणात जाणाऱ्या हजारो गणेशभक्तांना त्याचा फायदा होणार आहे. दरम्यान, राज्य परिवहन विभागाकडूनही गणेशोत्सवात जादा बसेस सोडल्या जाणार आहेत.

मुंबई, ठाणे व पालघरमधील कोकणातील चाकरमान्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या गणपती उत्सवासाठी यंदा २.२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान ५,२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिकांना विशेष बसमध्ये सवलत्त असणार आहे. नियमित एसटी स्टॅण्डवरील गर्दी टाळण्यासाठी महामुंबईत तात्पुरते ४० बस थांबेदेखील निश्चित केले आहेत. गौरी-गणपतीत जादा वाहतुकीसाठी मुंबई, पालघर, ठाणे विभागातून प्रवाशांच्या मागणीनुसार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही स्वरूपात जादा गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात येत आहेत, असे एसटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथकेदेखील तैनात करण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular