26.4 C
Ratnagiri
Monday, October 13, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeMaharashtraडिसेंबरमध्ये होणार जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका?

डिसेंबरमध्ये होणार जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका?

मध्य प्रदेश सरकारकडे २० हजार मशीन मागविल्या जाणार आहेत.

राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित ३२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या गट व गणनिहाय अंतिम मतदार याद्या व मतदान केंद्रांची यादी २७ ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी सायंकाळी दिले. दिवाळीनंतर याद्या अंतिम होणार असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान होण्याची दाट शक्यता आहे.

प्रभागरचना पूर्ण – जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीने ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या गटाची व पंचायत समि तीच्या प्रभागरचना पूर्ण केली. आता मतदार यादीच कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

हरकती आणि सूचना – भंडारा, गोंदिया, मुंबई शहर व मुंबई उपनगर हे ४ जिल्हे वगळून राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत ३३६ पंचायत समित्या यांच्यासाठी हा मतदार यादीचा कार्यक्रम आहे. ८ ते १४ ऑक्टोबरदरम्यान हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. – २७ ऑक्टोबरला मतदार यादी व मतदान केंद्रे जाहीर झाल्यावर निवडणुकीची तारीख जाहीर केली जाईल. समितीच्या गणांची प्रभागरचना नुकतीच पूर्ण केली. आता मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

८ ऑक्टो. पर्यंत प्रारूप यादी – या निवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघाची १ जुलै २०२५ ची मतदार यादी विचारात घेतली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये व पंचायत समितीच्या गणांमध्ये विधानसभा मतदारसंघाची विद्यमान यादी विभाजित केली जाणार आहे. ८ ऑक्टोबरपर्यंत प्रारूप मतदार यादी तयार करावी. २७ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी मतदान केंद्रनिहाय प्रसिद्ध करावी, असे आयोगाने पत्रामध्ये म्हटले आहे.

दोन लाख मशीन लागणार ? – राज्य निवडणूक आयोगाकडे ६५ हजार ईव्हीएम मशीन आहेत. मध्य प्रदेश सरकारकडे २० हजार मशीन मागविल्या जाणार आहेत. तर आणखी एक लाख ईव्हीएम मशीनची ऑर्डर देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular