21.6 C
Ratnagiri
Tuesday, December 9, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriसाखरीनाटेतील धोक्याची सूचना देणारा बावटा शोभेचे बाहुले

साखरीनाटेतील धोक्याची सूचना देणारा बावटा शोभेचे बाहुले

साखरीनाटे बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे मच्छीमारी केंद्र आहे.

तालुक्यातील साखरीनाटे बंदरामध्ये मच्छीमारांना धोक्याची सूचना देण्यासाठी उभारण्यात आलेला टॉवर (बावटा) केवळ शोभेचे बाहुले बनला आहे. साखरीनाटे बंदरातून हा बावटा दिसत नसल्याने मच्छीमारांसाठी तो असून नसल्यासारखा आहे. त्यामुळे धोक्याची सूचना देण्यासाठी उभारण्यात आलेला टॉवर साखरीनाटे डुंगेरी भागात उभारावा अशी मागणी मच्छीमार बांधवांकडून केली जात आहे. साखरीनाटे बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे मच्छीमारी केंद्र आहे. या बंदर पसिरामध्ये सुमारे २५० ते ३०० नोंदणीकृत मच्छीमारी नौका असून दररोज या बोटींमार्फत समुद्रात जाऊन मासेमारी करून परततात. या महत्वाच्या बंदराच्या सुरक्षेसाठी जैतापूर बंदर कार्यालयाच्या मागे बंदर विभागातर्फे एक टॉवर उभारण्यात आला. टॉवरवर बावटा (ध्वज) लावून मच्छीमारांना धोक्याची सूचना दिली जाते. मात्र, हा टॉवर साखरीनाटे बंदर परिसरातून अजिबात दिसत नसल्याने तो केवळ नावापुरता ठरत आहे.

मच्छीमारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उभारलेला हा टॉवर प्रत्यक्षात उपयोगी पडत नसल्याने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सुरक्षेसाठी असलेली सुविधा जर मच्छीमारांनाच दिसली नाही तर त्याचा काय उपयोग? असा थेट सवाल मच्छीमार करत आहेत. सध्या अस्तित्वात असलेला टॉवर केवळ जागेअभावी उभारला गेला की जबाबदारी झटकण्यासाठी असा प्रश्नही स्थानिकांतून उपस्थित केला जात आहे. मच्छीमारांच्या सुरक्षेशी संबंधित असलेल्या या साधनाची दृष्यमानता ही मुलभूत अट आहे. तीच अट पूर्ण होत नसल्याने मच्छीमारांच्या सुरक्षिततेशी प्रत्यक्षात तडजोड केली जात असल्याचे बोलले जात आहे. मच्छीमारांसाठी निरूपयोगी ठरणारा हा टॉवर डुंगेरी भागात हलवावा अशी मागणी मच्छीमारांकडून केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular